Tata Motors Commercial Vehicles Price Hike : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. १ जुलै २०२२ पासून कंपनीच्या विविध व्यावसायिक वाहनांच्या किमती १.५ ते २.५ टक्क्यांनी वाढणार आहेत. वैयक्तिक मॉडेल आणि व्हेरियंटवर आधारित दरवाढ केली जाईल.

कारण काय?

टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर इनपुट खर्चाचा महत्त्वपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी कंपनी विविध उपाययोजना करत आहे, परंतु आता एकूण इनपुट खर्चात तीव्र वाढ झाल्यामुळे, या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणे आवश्यक आहे. आहे. कंपनीने किमान दरवाढीद्वारे आपला इनपुट खर्च संतुलित करण्याचा प्रयत्न केला आहे.

(हे ही वाचा: ‘Bharat NCAP क्रॅश टेस्ट रेटिंग सिस्टम’ लवकरच होणार लॉंच; आता सुरक्षिततेची दिली जाईल हमी)

टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन कंपनी आहे, जी पिकअप, ट्रक, कार आणि बस तयार करते. टाटा मोटर्स ही पॅसेंजर वाहन विभागातील देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टाटा मोटर्सची भारताबरोबरच अमेरिका, ग्रेट ब्रिटन, इटली आणि दक्षिण कोरियामध्ये केंद्रे आहेत. त्याच वेळी, जेव्हा कामकाजाचा विचार केला जातो, तेव्हा टाटाची उत्पादने भारतात तसेच यूके, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, रशियासह इतर देशांमध्ये विकली जातात.

(हे ही वाचा: विश्लेषण : २०३० पर्यंत भारतात विकली गेलेली ३०% हुन जास्त वाहने इलेक्ट्रिक असतील; संशोधनाचा निष्कर्ष)

‘या’ कंपन्यांनी आधीच वाढवली आहे किंमत

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनेही गेल्या १८ एप्रिलमध्ये सर्व मॉडेल्सच्या किमती सरासरी १.३ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मारुती सुझुकीने ६ एप्रिल रोजी दरवाढीची घोषणा केली होती. याआधी १ एप्रिलपासून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, टोयोटा या कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किमतीत २.५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती.

(हे ही वाचा: पावसाळ्यात बाईक चालवत असाल तर, अपघात टाळण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो)

प्रवासी वाहनांच्या निर्यातीत ४३ टक्के वाढ

ऑटो उद्योग संस्था सिआम (SIAM) च्या मते, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतातून प्रवासी वाहनांच्या निर्यातीत ४३ टक्क्यांनी वाढ झाली असून, मारुती सुझुकी इंडिया २.३ लाखांहून अधिक युनिट्ससह आघाडीवर आहे. आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये प्रवासी वाहनांची (PV) एकूण निर्यात ५,७७,८७५ युनिट्स होती, तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ४,०४,३९७ युनिट्स होता.