scorecardresearch

Tata Motors लाँच करणार चार इलेक्ट्रिक कार; चांगल्या मायलेजसह मिळणार हायटेक फिचर्स, जाणून घ्या

टाटा मोटर्स लवकरच भारतीय देशांतर्गत बाजारात त्यांच्या चार इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. त्यापैकी कंपनीने इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्ही Curvv बद्दल तपशील जारी केले आहेत.

Tata_Curvv1
Tata Motors लाँच करणार चार इलेक्ट्रिक कार; चांगल्या मायलेजसह मिळणार हायटेक फिचर्स, जाणून घ्या

टाटा मोटर्स लवकरच भारतीय देशांतर्गत बाजारात त्यांच्या चार इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. त्यापैकी कंपनीने इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्ही Curvv बद्दल तपशील जारी केले आहेत. टाटा मोटर्स २०२६ पर्यंत भारतात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये १० नवीन कार लाँच करणार आहे. यापैकी कंपनी पुढील दोन वर्षांत ३ किंवा ४ इलेक्ट्रिक कार लाँच करेल. याशिवाय टाटा मोटर्सने २०२३ पर्यंत त्यांच्या २ नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही देखील टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक कार लाँच होण्याची वाट पाहत असाल, तर पुढील दोन वर्षांत लाँच होणार्‍या इलेक्ट्रिक कारचे संभाव्य तपशील येथे जाणून घ्या.

Tata Nexon EV Long Range: टाटा मोटर्स इलेक्ट्रिक एसयूव्ही Tata Nexon EV च्या लाँग रेंज व्हेरियंटवर वेगाने काम करत आहे. Tata Nexon EV मध्ये कंपनी ४० किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी पॅक देऊ शकते. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर ४०० किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. सध्याच्या Nexon EV मध्ये, कंपनीने ३०.२ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ३१२ किमीची रेंज देऊ शकते. तसेच, कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये कॉस्मेटिक आणि बूट स्पेसमध्ये काही बदल करू शकते.

Tata Altroz ​​EV: कंपनीने २०२० ऑटो एक्स्पोमध्ये Tata Altroz ​​EV प्रदर्शित केली आहे. ही कार लवकरच लाँच होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, Tata Altroz ​​EV मध्ये ३०.२ किलोवॅट क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर ३०० किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल.

Tata Punch EV: टाटा पंच ही या देशातील सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही आहे. ही गाडी कंपनी CNG आणि इलेक्ट्रिक दोन्ही प्रकारांमध्ये लाँच करू शकते. कंपनी २०२३ मध्ये टाटा पंचची इलेक्ट्रिक आवृत्ती लाँच करू शकते. या मायक्रो एसयूव्हीमध्ये २५ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक देण्याची शक्यता आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर २५० ते ३०० किमीची रेंज देण्यास सक्षम असेल. या व्यतिरिक्त, कंपनी नेक्सॉन इव्ही प्रमाणेच टाटा पंच इलेक्ट्रिकमध्ये Ziptron तंत्रज्ञान वापरू शकते.

Tata Curvv EV: टाटा मोटर्सने या संकल्पना कारचे अनावरण केले आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनी २०२४ मध्ये सादर करू शकते. इलेक्ट्रिक व्हर्जन व्यतिरिक्त कंपनी या एसयूव्हीचे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरियंटही बाजारात आणू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी X1 प्लॅटफॉर्मवर ही इलेक्ट्रिक एसयूव्ही बनवणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata motors to launch four electric cars rmt

ताज्या बातम्या