Tata Electric Cars: टाटा मोटर्स कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहे. कंपनी टिगॉर, नेक्सॉन आणि टियागोचं आयसीई व्हर्जन देखील विकत आहे. याच मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक किट आणि काही कॉस्मेटिक बदल करून कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. आता कंपनीने इलेक्ट्रिक कार उद्योगात टिकून राहण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाची घोषणा केली, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड अंतर्गत तीन प्लॅटफॉर्मचा समावेश आहे, ज्या अंतर्गत कंपनी पुढील दहा वर्षांसाठी इलेक्ट्रिक कार लाँच करेल. दरम्यान, टाटा आपल्या काही पेट्रोल-डिझेल कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याच्या देखील तयारीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ दोन इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच होणार

टाटा मोटर्स येत्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये Tata Altroz ​​EV आणि Tata Punch EV हे दोन्ही मॉडेल लाँच करणार असल्याची माहिती आहे. आगामी Tata Altroz ​​EV आणि Tata Punch EV सिग्मा प्लॅटफॉर्मवर तयार केले जातील. सिग्मा प्लॅटफॉर्म अल्फा आर्किटेक्चरवर आधारित आहे. आगामी टाटा इलेक्ट्रिक कार या ब्रँडच्या Ziptron हाय-व्होल्टेज तंत्रज्ञानाचा वापर करतील.

(आणखी वाचा : फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 83kmpl मायलेजवाली ही बाईक; वाचा काय आहे ऑफर )

रेंज

टाटा पंच ईव्हीला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरहून अधिकची रेंज मिळेल. याशिवाय, टाटा Altroz ​​EV आणि Tata Panch EV वर काही EV-विशिष्ट डिझाइन अपडेट्स सादर करेल.

किमती

Altroz ​​EV आणि Punch EV च्या किमती त्यांच्या पेट्रोल-डिझेल प्रकारांपेक्षा जास्त असतील. सध्या, Tata Altroz ​​हॅचबॅक मॉडेल लाइनअपची किंमत ६.३५ लाख ते १०.२५ लाख रुपये आहे. तर पंच मिनी एसयूव्हीची किंमत ६ लाख ते ९.५४ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors will launch both tata altroz ev and tata punch ev in electric versions in 2023 pdb
First published on: 03-12-2022 at 17:50 IST