scorecardresearch

महिना बदलला, वर्ष बदललं तरी ‘या’ कारचा दबदबा कायम, ३१ दिवसात विकल्या १५,५६७ गाड्या

वर्ष बदललं तरी एका एसयूव्हीचा बाजारातला दबदबा कायम आहे. ही कार गेल्या दोन वर्षातल्या बाजारातल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत आहे.

Tata Nexon sale in january 2023
वर्ष बदललं तरी एका एसयूव्हीचा बाजारातला दबदबा कायम आहे. (PC : Tata Motors)

वर्ष बदललं तरी एका एसयूव्हीचा बाजारातला दबदबा कायम आहे. ही कार गेल्या दोन वर्षातल्या बाजारातल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत आहे. आम्ही सध्या टाटा मोटर्सची बेस्ट सेलिंग कार नेक्सॉनबद्दल बोलत आहोत. २०२२ या संपूर्ण वर्षभरात या कारने भारतीय वाहन बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या कारची कामगिरी २०२३ मध्येदेखील कायम आहे. आम्ही असं बोलतोय कारण ही कार नव्या वर्षातल्या पहिल्या महिन्यात देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींच्या यादीत पहिल्या नंबरवर कायम आहे.

टाटा मोटर्सने जानेवारी २०२३ मध्ये नेक्सॉनच्या १५,५६७ युनिट्सची विक्री केली आहे. या विक्रीसह नेक्सॉनने ह्युंदाई क्रेटा आणि मारुती वॅगनआर कारला मागे टाकलं आहे. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप ५ एसयूव्हींमध्ये टाटा पंचचा देखील समावेश आहे. या दोन्ही कार्सने पुन्हा एकदा ३० दिवसात १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.

नेक्सॉनला ग्राहकांची पसंती

गेल्या महिन्यात टाटा नेक्सॉनच्या १५,५६७ युनिट्सची विक्री झाली आहे. नेक्सॉनमध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स मिळतात. तसेच ही कंपनीची सर्वात सुरक्षित कार देखील आहे. या कारला सुरक्षेच्या बाबतीत ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. यात ७ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते. त्यासोबत डिजीटल एलसीडी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, मल्टी फंक्शनल स्टीअरिंग व्हील आणि इलेक्ट्रिक सनरूफसारखे प्रीमियम फीचर्स यात मिळतात. या दमदार फीचर्समुळेच ग्राहकांची या कारला पसंती मिळत आहे.

हे ही वाचा >> टाटा मोटर्सचा ग्राहकांना धक्का, देशातल्या सर्वात स्वस्त आणि सुरक्षित SUV चं बेस्ट सेलिंग मॉडेल केलं बंद

क्रेटा नंबर २ तर ब्रेझा तिसऱ्या स्थानी

ह्युंदाईची मोस्ट सेलिंग एसयूव्ही क्रेटा देखील या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या १५,०३७ युनिट्सची विक्री केली आहे. नेक्सॉन आणि क्रेटाच्या विक्रीत ५३० युनिट्सचा फरक आहे. तर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींच्या यादीत मारुती सुझुकी ब्रेझा ही कार तिसऱ्या नंबरवर आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या १४,३५९ युवनिट्सची विक्री केली आहे. ब्रेझासह टाटा पंच, किआ सेल्टॉस, किआ सोनेट, ह्युंदाई वेन्यू, महिंद्रा स्कॉर्पिओ एन या कार्सना बाजारात तगडी डिमांड आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:44 IST
ताज्या बातम्या