कमी किंमत अधिक वैशिष्ट्ये आणि दमदार सुरक्षा यासाठी ग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या टाटाने चमकदार कामगिरी केली आहे. एसयूव्ही टाटा नेकसॉनचे उत्पादन ४ लाख युनिटच्या पार गेले आहे. तब्बल पाच वर्षांनंतर टाटा मोटर्सने हे यश संपादन केले आहे. या यशानंतर कंपनीने टाटा नेकॉसॉनचे एक्स झेड प्लस एल व्हेरिएंट लाँच केले आहे. कंपनीने या व्हेरिएंटची किंमत ११.३८ लाख रुपये ठेवली आहे. नेकसॉनचे हे नवे व्हेरिएंट देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा ठेवली जात आहे.

असा होता प्रवास

सप्टेंबर २०१७ मध्ये टाटा नेक्सॉन लाँच झाली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही कार बनली होती. टाटाला या एसयूव्हीचे १ लाख युनिट्सचे उत्पादन पूर्ण करण्यासाठी १ वर्ष १० महिने लागले होते. २ लाख युनिट्सचा आकडा पुढील १ वर्ष ११ महिने आणि ३ लाख युनिटचा आकडा त्याच्या पुढील वर्षी ८ महिन्यांत पूर्ण झाला होता. मागील १ लाख युनिटचा आकडा पार होण्यासाठी केवळ ७ महिन्यांचा कालावधी लागला. यातून या कारची किती झटपट मागणी वाढली आणि चाहत्यांमध्ये तिची किती क्रेझ आहे हे दिसून येते.

(इर्टिगाचे नवे अवतार आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच, ‘या’ कॅमेऱ्याची जोरदार चर्चा, कारच्या सुरक्षेसाठी दिले हे फिचर)

टाटाने लाँच केले XZ+ (L) व्हेरिएंट

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने टाटा नेक्सॉन ही एक मजबूत कार मानली जाते. विश्व NCAP क्रॅश टेस्ट चाचणीमध्ये या कारला ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. NCAP मध्ये ५ स्टार मिळवणारी नेक्सॉन ही पहिली भारतीय कार आहे. त्यामुळे, एक्सझेड प्लस एल पासूनही सुरक्षेच्या बाबतीत अशीच अपेक्षा आहे. नव्या व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर आणि वेंटिलेटेड सीट सारखे अप्रतिम फीचर मिळणार आहेत. हे व्हेरिएंट पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजनसह सादर करण्यात आले आहे.

या वानांना देणार आव्हान

Tata Nexon ही भारतीय कार बाजारपेठेतील एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. बाजारात तिची स्पर्धा किया सोनेट, ह्युंडाई वेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० आणि नवीन मारुती सुझुकी ब्रेझाशी आहे. टाटाच्या आगामी लाँच बद्दल बोलायचे झाल्यास कंपनी आज २२ सप्टेंबर रोजी टाटा पंचचे कॅमो एडिशन लाँच करणार आहे. याशिवाय टाटा टिआगो इव्ही इलेक्ट्रिक कार २८ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे.