Tata Punch Discount: भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणजे टाटा पंच. आता या कारवर टाटा मोटर्सनं २५ हजार रुपयांपर्यंतची सवलत जाहीर करून आपलं या उत्पादनाचं आकर्षण वाढवलं आहे. या पंच गाडीचा गवगवा अजून मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी EV मॉडेल वगळून टाटा मोटर्सनं सध्या पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनवर ही ऑफर जाहीर केली आहे.

टाटा पंच सवलत (Tata Punch Discount)

२०२४ हे वर्ष टाटा मोटर्सच्या पंच कारसाठी खास ठरलं. तसेच २०२३ मध्ये टाटा मोटर्सच्या ‘पंच’नं सीएनजी व्हर्जन लाँच केल्यानंतर त्यांच्या विक्रीत वाढ झाली.

job creation under modi government in 100 days
समोरच्या बाकावरुन : १०० दिवसांत बेकारीची शंभरी भरली नाहीच!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Sensex Crashed Today Stock Market Update in Marathi
Why Market down today: सेन्सेक्स १ हजार अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांचे पाच लाख कोटींचे नुकसान; कारण काय?
dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
Gold Silver Price
Gold-Silver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव उतरले, १० ग्रॅमची किंमत पाहून ग्राहक आनंदी!
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Paytm share price
Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ; पंतप्रधान मोदींनी क्युआर कोडची स्तुती केल्याबद्दल मानले आभार
Gold Silver Price
Gold-Silver Price: सणासुदीच्या दिवसांत घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत वाढ, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत

मायक्रो suv ने महिनोन महिने विक्रीची सर्वाधिक संख्या नोंदवली आहे. अशातच आता सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधी टाटा मोटर्सनं पेट्रोल व्हर्जनवर २५ हजार रुपयांपर्यंत आणि सीएनजी व्हर्जनवर २० हजार रुपयांपर्यंतची ऑफर जाहीर केली आहे. ऑगस्टच्या नवीन ऑफरसह टाटा मोटर्सनं या ‘पंच’च्या पेट्रोल मॉडेलसाठीसाठी ७,००० रुपयांपर्यंत आणि सीएनजी मॉडेलसाठी सुमारे २,००० रुपयांपर्यंत ही डील वाढवली आहे.

तसेच टाटा मोटर्सच्या या सर्व ऑफर (Tata Punch Discount) सध्याच्या २०२४ च्या पंच व्हर्जनवर आहेत.

हेही वाचा… Electric Car घ्यायचीय? थोडं थांबा, भारतात लाँच होतायत ५ नवीन इलेक्ट्रिक कार, मिळणार Advance फिचर्स अन् बरंच काही!

कार निर्मात्यांकडून २० हजार रुपयांची रोख सवलत आणि पाच हजार रुपयांची अतिरिक्त कॉर्पोरेट डील देण्यात येत आहे. दुसरीकडे पंच CNG वर १५ हजार रुपयांपर्यंत सवलत आणि पाच हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे.

टाटा पंच तपशील आणि किंमत (Tata Punch: Specs and Price)

पंच ६,००० rpm वर ८६.५ bhp आणि ३,१५० – ३,३५० rpm वर ११५ Nm च्या आउटपुटसह १.२-लीटर टर्बो पेट्रोल रेव्होट्रॉन इंजिनद्वारे समर्थित आहे. हे ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT या दोन ट्रान्स्मिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

दुसरीकडे CNG ट्रिम त्याच टर्बो पेट्रोल मोटरद्वारे चालवली जाते; परंतु ६,००० rpm वर ७२.४ bhp आणि ३,२५० rpm वर १०३ Nm पॉवर देते. सध्या याला फक्त ५-स्पीड मॅन्युअल मिळते, परंतु कार्ड्सवर AMT व्हर्जन असू शकते.

Tata Punch | किंमती, एक्स-शोरूम

Petrol | रु ७ लाख – रु १०.२० ल

CNG | रु ७.२३ लाख – रु ९.८५ लाख