Tata Punch EV: टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स देशात आपल्या सुरक्षित प्रवासी वाहनांसाठी ओळखली जाते. आता भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटवर Tata Motors ची चांगलीच पकड आहे. कंपनीच्या ईव्ही पोर्टफोलियोमध्ये सध्या चार कार आहेत. ज्यात Tata Tiago EV, Tata Tigor EV, Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX चा समावेश आहे. आता याच यादीमध्ये आणखी एका मॉडेलची भर पडणार असून Tata Motors ची आगामी Tata Punch EV लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक मायक्रो-एसयूव्ही कार असेल.

ऑटो एक्सपोमध्ये २०२३ मध्ये होणार लाँच?

२०२३ मधील ऑटो एक्सपोमध्ये Tata Punch EV सादर केली जाऊ शकते. मात्र, आतापर्यंत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. टाटा मोटर्स कंपनीने १८ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा पंच ही छोटी एसयूव्ही भारतात लाँच केली होती. तेव्हापासून ही कार भारतीय वाहन बाजारात सुपरहिट ठरली आहे. ही कार गेल्या काही महिन्यांपासून देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० वाहनांपैकी एक आहे. आता कंपनी ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

(हे ही वाचा : भन्नाट ऑफर! सिंगल चार्जमध्ये ४३७ किमी धावणारी टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार फक्त १.७५ लाख रुपयांत आणा घरी)

Tata Punch EV चे फीचर्स

Tata Punch EV ची स्पर्धा २०२३ मध्ये लाँच होणाऱ्या Citroen eC3 बरोबर होईल. या ईव्हीमध्ये झिपट्रॉन इलेक्ट्रिक इंजिन दिलं जाऊ शकतं. हेच इंजिन टाटा टिगॉर ईव्ही आणि टाटा टियागो ईव्हीमध्ये मिळतं. पंच इलेक्ट्रिक दोन बॅटरी ऑप्शनसह ऑफर केली जाऊ शकते, ज्यामध्ये पंच ईव्ही एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३०० ते ३५० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. पंच ईव्हीमध्ये पेट्रोल-डिझेल व्हेरिएंटसह काही इतर कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: इव्हेंट, कुठे आणि केव्हा होईल? तुम्हाला प्रवेश कसा मिळेल? कोणत्या कंपन्या करणार वाहने लाँच? जाणून घ्या सविस्तर)

नवीन टाटा पंच EV वरील सुरक्षा फीचर्समध्ये EBD सह ड्युअल एअरबॅग ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, डायनॅमिक गाईडवेसह कॅमेरा-आधारित रिव्हर्स पार्क असिस्ट आणि फॉलो-मी-होम हेडलॅम्प यांचा समावेश असू शकतो. इंटीरियरमध्ये पुश बटण स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, ऑटो फोल्ड आणि पूर्णपणे डिजिटल कन्सोलसह ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची अपेक्षा आहे.

टाटा पंच EV किंमत

नवीन Tata Punch EV ची किंमत सुमारे ११ लाख ते १३ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.