Tata 7-Seater SUV: Tata Motors ची Nexon देशात चांगलीच लोकप्रिय आहे, फेब्रुवारी २०२३ मध्ये ही दुसरी सर्वाधिक विकली जाणारी SUV होती. ही एक ५ सीटर SUV आहे, ज्याची किंमत ७.८० लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी १४.३५ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. त्याच्या टॉप व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे १६.५६ लाख रुपये आहे. आता जर तुम्ही त्याचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या किमतीत तुम्ही Tata Safari देखील खरेदी करू शकता. Tata Safari SUV ची सुरुवातीची किंमत १५.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात दोन सीटिंग कॉन्फिगरेशन मिळतात ६ सीट आणि ७ सीट पर्याय, तसेच ६ सीटर व्हेरियंटला मधल्या रांगेत कॅप्टनची जागा मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा सफारी एकूण ६ ट्रिम्स XE, XM, XMS, XT+, XZ आणि XZ+ मध्ये उपलब्ध आहे. त्याचा बेस व्हेरियंट XE आहे. यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. Tata Safari बेस व्हेरिएंट यात XE देखील अनेक वैशिष्ट्यांसह येतो. यात टिल्स आणि टेलिस्कोपिक अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील, डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, सीट-बेल्ट रिमाइंडर सिस्टम, स्पीड अलर्ट सिस्टम, हिल होल्ड कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, रोल ओव्हर मिटिगेशन, चारही सुविधांचा समावेश आहे. चाकावर डिस्क ब्रेक, छतावरील रेल आणि रिक्लाइनिंग दुसऱ्या रांगेतील सीट उपलब्ध आहेत.

(हे ही वाचा : भारीच…! Toyota Fortuner आणा Creta च्या किमतीत घरी, ऑफर पाहून लागेल वेड )

विशेष म्हणजे, टाटा सफारीमध्ये २-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे १७०PS पॉवर आणि ३५०Nm टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. अलीकडेच, टाटा ने सफारीचे रेड डार्क एडिशन देखील लाँच केले आहे, ज्यामध्ये ADAS सह अनेक वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata safari 7 seater suv can be bought at the price of nexon the base variant also has great features pdb
First published on: 21-03-2023 at 17:59 IST