टाटा मोटर्स आता त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन लाइन-अपमध्ये त्यांच्या छोट्या कार टियागोचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर करणार आहे. २०२२ च्या जागतिक ईव्ही दिनानिमित्त कंपनीने पुष्टी केली होती की ती Tiago EV लाँच करणार आहे. कंपनीची सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार म्हणून ती येईल. लाँचपूर्वी या वाहनाची किंमत आणि रेंज लीक झाली आहे. नवीन इलेक्ट्रिक Tiago २८ सप्टेंबर २०२२ ला लाँच होईल. Tiago EV मध्ये, कंपनी सध्याच्या Tigor Electric पेक्षा लहान बॅटरी पॅक करू शकते. सविस्तर जाणून घेऊया…

रेंज आणि किंमत
नवीन टियागो इलेक्ट्रिकला टिगोर इलेक्ट्रिक सेडानपेक्षा लहान बॅटरी पॅक मिळू शकतो. तसे, सध्याच्या Tigor EV ला २६kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो, जो ३०६ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो. असे मानले जाते की नवीन Tiago EV पूर्ण चार्ज केल्यावर ३०० किमी अंतर कापू शकते. नवीन मॉडेलच्या बाह्य डिझाइनपासून ते आतील भागात बरेच बदल केले जाऊ शकतात.

(हे ही वाचा : Keeway ने भारतात सादर केल्या दोन नवीन दुचाकी; जाणून घ्या किंमत किती? )

किंमत
लाँच होण्यापूर्वी नवीन Tiago इलेक्ट्रिक कारच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसली तरी, असे मानले जाते की त्याची सुरुवातीची किंमत १० लाख रुपये असू शकते. Tigor EV ची किंमत १२.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. अशा परिस्थितीत ही टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ईव्ही असेल असे मानले जात आहे.

ही कार सर्वांच्या बाजेमध्ये असेल, सध्या, कंपनीने त्याची यंत्रणा, मोटर किंवा बॅटरी पॅकबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. टाटा मोटर्सचे पुढील पाच वर्षांत १० इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याचे उद्दिष्ट आहे.