आयपीएलच्या 16व्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. IPL २०२३ आज (३१ मार्च) पासून सुरु होणार आहे. या आयपीलचे Tata हे टायटल स्पॉन्सर आहेत. यावेळी टाटा मोटर्सची Tiago EV कंपनीकडून अधिकृत भागीदार म्हणून या लीगमध्ये सहभागी होत आहे. IPl मध्ये पहिला सामना चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या पार्टनरशिपबद्दल बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे (Marketing, Sales and Service Strategy) प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले , सलग ५ यशस्वी सीझननंतर आम्ही Tata IPL सह आमची सर्वात नवीन EV , आमची प्रीमियम इलेट्रीक हॅचबॅक Tiago EV सादर करत आहोत. या नवीन उत्पादनासह, भारतातील प्रत्येक भागात EV कार नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हेही वाचा : मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून Hero Motocorp च्या CEO पदाची धुरा आता निरंजन गुप्ता यांच्या हाती; तब्बल २५ वर्षांचा आहे अनुभव अधिकृत भागीदार म्हणून, कंपनी टाटा IPL प्लॅटफॉर्म वापरून सर्व १२ स्टेडियममध्ये नवीन Tiago EV प्रदर्शित करेल. यासोबतच ही कार खरेदी करण्याच्या १०० कारणांचा प्रचार कंपनी करणार आहे. आयपीलमध्ये कंपनीच्या या अभियानाची सुरुवात होणार आहे. टाटा टिआगो EV (image credit - financial express) या हंगामातील सर्व सामने Tiago EV इलेक्ट्रिक स्ट्रायकर अवॉर्डसाठी देखील खेळले जातील. ज्यामध्ये मॅचमध्ये सार्वधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूला १,००,०० रुपये रोख असे बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार आहे. संपूर्ण हंगामात सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूला Tiago EV बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. हेही वाचा : Petrol-Diesel Price on 30 March: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर टाटा मोटर्स हे २०१८ पासून आयपीएलशी संबंधित आहे. या सीझनमध्ये Nexon, Harrier, Altroz आणि Punch या कार्स सादर केल्या. या वर्षीच्या सीझनमध्ये Tiago EV सादर करणे म्हणजे देशातील हरित ऊर्जा प्रकल्पाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.