scorecardresearch

१ लाख भरा अन् Tata Motors ची सर्वाधिक विक्री होणारी CNG कार घरी न्या; एवढा बसेल EMI

Tata Motors CNG Car: खुशखबर,टाटा मोटर्सची हॅचबॅक डाउन पेमेंटवर १ लाखात खरेदी करता येणार

१ लाख भरा अन् Tata Motors ची सर्वाधिक विक्री होणारी CNG कार घरी न्या; एवढा बसेल EMI
Tata Tiago XE CNG 1 लाखाचे डाउन पेमेंट करुन खरेदी करा (Photo-financialexpress)

Tata Motors CNG Car: ऑटो सेक्टरमध्ये पेट्रोल आणि डिझेल कार व्यतिरिक्त आता सीएनजी कारच्या मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. सीएनजी कारची मागणी पाहता मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत अनेक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या सीएनजी व्हर्जन लाँच करण्यास सुरुवात केली आहे.

सीएनजी कारच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे टाटा मोटर्सची हॅचबॅक टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago XE CNG) जी त्याच्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणली जाते. कमी किंमतीव्यतिरिक्त मायलेज आणि फीचर्समुळे तिला मोठी पसंती मिळते.

Tata Tiago CNG किंमत

Tata Tiago CNG ची एक्स-शोरूम किंमत ६,३४,९०० रूपये आहे जी ऑन-रोड असताना ७,१६,६३८ रूपये आहे. या कारची किंमत जाणून घेतल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी सुलभ फायनान्स प्लॅन जाणून घ्या…

Tata Tiago रोखीने खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७ लाख रुपयांची आवश्यकता असेल. परंतु फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही १ लाख रुपये खर्च करून ही कार घरी नेऊ शकता.

(हे ही वाचा : फक्त 1 लाख भरून घरी आणा तुमची आवडती Tata Punch; महिन्याला भरा ‘इतका’ EMI)

Tiago XE CNG फायनान्स प्लॅन

ऑनलाइन उपलब्ध डाउन पेमेंट आणि EMI प्लॅननुसार, बँक Tata Tiago चे CNG व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी ६,१६,६३८ रुपये कर्ज देईल आणि बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याजदर आकारेल.

कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून १ लाख रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर पुढील ५ वर्षांसाठी दरमहा १३,०४१ रुपये मासिक ईएमआय द्यावा लागेल.

टाटा टियागो सीएनजी फायनान्स प्लॅनचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि मायलेजचे संपूर्ण तपशील देखील जाणून घ्या.

(हे ही वाचा : केवळ ५० हजारात खरेदी करा Hyundai ची बेस्ट सेलिंग कार, महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI )

Tata Tiago XE CNG mileage
ARAI ने प्रमाणित केलेल्या मायलेजनुसार, CNG किटसह Tata Tiago २६.४९ kmpl मायलेज देते.

Tata Tiago XE CNG Engine and Transmission
Tata Tiago मध्ये ११९९ cc चे इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन ७२ bhp पॉवर आणि ३५० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Tiago XE CNG Features
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम सारखे फीचर्स दिले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 21:00 IST

संबंधित बातम्या