कार क्षेत्रातील सेडान सेगमेंटमध्ये येणाऱ्या कार्स त्यांच्या किमतीव्यतिरिक्त फीचर्स, मायलेज आणि डिझाईनसाठी पसंत केल्या जातात. मारुती, होंडा, टाटा यांसारख्या कंपन्यांच्या गाड्या या सेगमेंटमध्ये आहेत. ज्यामध्ये आम्ही टाटा मोटर्सची लोकप्रिय सेडान कार टाटा टिगोर बद्दल बोलत आहोत, जी कमी किमतीशिवाय मायलेज, फीचर्स आणि डिझाईनसाठी पसंत केली जाते.

Tata Tigor X Z Plus हे सेडानचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७,६६,९०० रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली) जी ऑन-रोड ८,६५,०७१ रुपयांपर्यंत जाते.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी

जर तुम्हाला ही सेडान आवडत असेल परंतु ती खरेदी करण्यासाठी बजेट तयार केले नसेल, तर ती खरेदी करण्याचा सोपा फायनान्स प्लॅन येथे आहे.

ऑनलाइन डाउनपेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही सेडान खरेदी केली तर बँक यासाठी ७,६६,९२९ रुपये कर्ज देईल. हे कर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला किमान ८५,००० रुपये डाउनपेमेंट जमा करावे लागेल. यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला १६,२२० ृरुपये मासिक EMI भरावे लागेल.

टाटा टिगोर एक्स झेड प्लसवर या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या काळात बँक ९.८ टक्के वार्षिक दराने व्याज आकारेल.

आणखी वाचा : Bajaj Pulsar NS 125 vs TVS Raider: स्टाईल, स्पीड, मायलेज आणि किमतीत कोणती एन्ट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक चांगली? जाणून घ्या

या कर्जाचे तपशील, डाउनपेमेंट आणि फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध EMI प्लॅन जाणून घेतल्यानंतर, तुम्ही या सेडानचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.

Tata Tigor XZ Plus च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात ११९९ cc चे तीन सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८४.८२ bhp पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही सेडान १९.२७ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.