scorecardresearch

इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये Tata वर्चस्व गाजवणार! लवकरच लाँच करणार चार इव्ही; पाहा यादी

टाटा लवकरच चार आकर्षक इलेक्ट्रॉनिक कार लाँच करणार आहे.

इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये Tata वर्चस्व गाजवणार! लवकरच लाँच करणार चार इव्ही; पाहा यादी
(फोटो- TATA MOTORS)

भारतात इलेक्ट्रिक दुचाकीप्रमाणे इलेक्ट्रिक चारचाकी गाड्यांचीही मागणी वाढत आहे. आघाडीच्या सर्व कार उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक सेगमेंटमध्ये गाड्या लाँच केल्या आहेत आणि आता इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यातच आता टाटाने या स्पर्धेत सहभाग घेत लवकरच चार इलेक्ट्रॉनिक कार लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या टाटाची नेक्सॉन इव्ही लोकप्रिय आहे. यासह इलेक्ट्रिक गाडयांमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी टाटा कोणत्या कार लाँच करणार आहे जाणून घेऊया.

टाटा पंच

  • टाटा पंच ही १० लाखांच्या आत येणारी उत्तम कार आहे.
  • ही कार अल्फा प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. टाटा पंच ही कार लवकरच नव्या स्वरूपात लाँच केली जाणार आहे.

अल्ट्रोझ इव्ही

  • टाटा अल्ट्रोझ ​​इव्ही ऑटो एक्सपो स्वरूपात २०२० मध्ये लाँच करण्यात आली होती.
  • ही कार २०२३ मध्ये नव्या स्वरूपात लाँच होण्याची शक्यता आहे.
  • अल्ट्रोझ ​​इव्ही एका चार्जवर जवळपास ४०० किमीची रेंज देईल.

आणखी वाचा : दिवाळीला नवी गाडी घेणार आहात? बजेटमध्ये बसणाऱ्या टॉप पाच कार कोणत्या आहेत पाहा

टाटा कर्व

  • ‘टाटा कर्व इव्ही’ला याआधी टाटाकडुन सादर करण्यात आले होते. आता टाटा कर्व नव्या स्वरूपात २०२४ मध्ये भारतात लाँच केले जाऊ शकते.
  • कर्व इव्ही टाटा एक्स१ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, याची किंमत २५ ते ३० लाख रुपये असू शकते.

टाटा अविन्या

  • ‘टाटा अविन्या इव्ही’ची संकल्पना टाटाने यापूर्वी सादर केली होती. ही संकल्पना नवीन जेन ३ आर्किटेक्चरवर आधारित असणार आहे.
  • या नव्या वर्जनला २०२५ किंवा २०२६ च्या सुरुवातीला देशात लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या