इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये Tata वर्चस्व गाजवणार! लवकरच लाँच करणार चार इव्ही; पाहा यादी | Tata to launch 4 new electric cars in India Know price and features | Loksatta

इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये Tata वर्चस्व गाजवणार! लवकरच लाँच करणार चार इव्ही; पाहा यादी

टाटा लवकरच चार आकर्षक इलेक्ट्रॉनिक कार लाँच करणार आहे.

इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये Tata वर्चस्व गाजवणार! लवकरच लाँच करणार चार इव्ही; पाहा यादी
(फोटो- TATA MOTORS)

भारतात इलेक्ट्रिक दुचाकीप्रमाणे इलेक्ट्रिक चारचाकी गाड्यांचीही मागणी वाढत आहे. आघाडीच्या सर्व कार उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक सेगमेंटमध्ये गाड्या लाँच केल्या आहेत आणि आता इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यातच आता टाटाने या स्पर्धेत सहभाग घेत लवकरच चार इलेक्ट्रॉनिक कार लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या टाटाची नेक्सॉन इव्ही लोकप्रिय आहे. यासह इलेक्ट्रिक गाडयांमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी टाटा कोणत्या कार लाँच करणार आहे जाणून घेऊया.

टाटा पंच

  • टाटा पंच ही १० लाखांच्या आत येणारी उत्तम कार आहे.
  • ही कार अल्फा प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. टाटा पंच ही कार लवकरच नव्या स्वरूपात लाँच केली जाणार आहे.

अल्ट्रोझ इव्ही

  • टाटा अल्ट्रोझ ​​इव्ही ऑटो एक्सपो स्वरूपात २०२० मध्ये लाँच करण्यात आली होती.
  • ही कार २०२३ मध्ये नव्या स्वरूपात लाँच होण्याची शक्यता आहे.
  • अल्ट्रोझ ​​इव्ही एका चार्जवर जवळपास ४०० किमीची रेंज देईल.

आणखी वाचा : दिवाळीला नवी गाडी घेणार आहात? बजेटमध्ये बसणाऱ्या टॉप पाच कार कोणत्या आहेत पाहा

टाटा कर्व

  • ‘टाटा कर्व इव्ही’ला याआधी टाटाकडुन सादर करण्यात आले होते. आता टाटा कर्व नव्या स्वरूपात २०२४ मध्ये भारतात लाँच केले जाऊ शकते.
  • कर्व इव्ही टाटा एक्स१ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, याची किंमत २५ ते ३० लाख रुपये असू शकते.

टाटा अविन्या

  • ‘टाटा अविन्या इव्ही’ची संकल्पना टाटाने यापूर्वी सादर केली होती. ही संकल्पना नवीन जेन ३ आर्किटेक्चरवर आधारित असणार आहे.
  • या नव्या वर्जनला २०२५ किंवा २०२६ च्या सुरुवातीला देशात लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
वाहनप्रेमींमध्ये चर्चा ‘महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट’ची; जाणून घ्या फीचर्स आणि बरचं काही…

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: तुमच्या कारमध्ये काही समस्या असेल तर लगेच संपर्क साधा; ‘या’ गाड्यांसाठी विशेष सर्व्हिस मोहीम
केवळ ६६ हजारांमध्ये मिळतेय डबल डिस्क आणि ABS सह TVS Apache RTR 200 4V, १ वर्षाची वॉरंटी
Petrol-Diesel Price on 1 October 2022: ग्राहकांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने घसरण
झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
६० टक्के मतदान : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात मतदारांचा निरुत्साह
अभ्यासक्रम अर्धवट सोडणाऱ्यांनाही कौशल्यानुसार प्रमाणपत्र; येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी
कालमर्यादेत नस्ती निकाली काढण्याचे बंधन; सरकारी कार्यालयांत १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली
नागपूर-शिर्डी प्रवासात ९०० रुपये टोल; समृद्धी महामार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित
केंद्रीय मंत्र्यांचे १७ लोकसभा मतदारसंघांत पक्षबांधणीसाठी दौरे