चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे चीनमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. करोना रोखण्यासाठी स्थानिक सरकारनं निर्बंध कडक केले आहे. त्यामुळे याचा फटका उत्पादन क्षेत्रालाही बसला आहे. टेस्ला कंपनीने आपल्या शांघाय प्लांटमधील उत्पादन कमीत कमी चार दिवसांसाठी बंद करण्याची योजना आखली आहे. टेस्लाच्या देशाबाहेरील पहिल्या गिगाफॅक्टरीने गेल्या वर्षी अर्ध्याहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केले. या महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस उत्पादन स्थगित करावे लागल्याने उत्पादन क्षमतेला खिळ बसली. कंपनीने यावेळी सांगितले की, “कोविड चाचण्या आणि संबंधित साथीच्या रोग प्रतिबंधक उपायांसाठी सरकारच्या आदेशाला सक्रियपणे सहकार्य करत असताना, प्लांटमध्ये उत्पादन सुरू ठेवता येईल याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.”

शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंबंधी माहिती दिली आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात शहराला दोन भागात विभाजणाऱ्या Huangpu River मधील पश्चिम भागात पाच दिवसांचा लॉकडाउन केला जाणार आहे. नागरिकांना घरातच थांबावं लागणार असून इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी सामान चेक पॉइंटवर ठेवलं जाणार आहे. अत्यावश्यक नसणारी कार्यालयं आणि सर्व व्यवसाय बंद राहतील. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद केली जाणार आहे. याआधीच चीनमध्ये २.५ कोटींहून जास्त लोकांना लॉकडाउनध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना करोनासाठी अनेक चाचण्या कराव्या लागत आहेत. शांघाईमधील डिस्ने थीम पार्क याआधी बंद करण्यात आलेल्या व्यवसायांपैकी एक आहे.

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

Ola Electric Scooter ला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल, कंपनीने दिले चौकशीचे आदेश

टेस्लासाठी शांघाय कारखाना महत्त्वपूर्ण आहे. चीन ही कंपनीची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि हा प्लांट युरोप आणि आशियातील इतरत्र निर्यातीसाठी कार तयार करते. चायना पॅसेंजर कार असोसिएशनने या महिन्याच्या सुरुवातीला नोंदवले की टेस्लाने फेब्रुवारीमध्ये कारखान्यातून ५६,५१५ कार वितरित केल्या. यापैकी २३,३०० गाड्या देशांतर्गत बाजारात तर, ३३,३१५ गाड्यांची निर्यात केली.