टेस्लाच्या गाड्यांबाबत लोकांमध्ये कायमच उत्सुकता असते. आता एलन मस्क यांच्या कंपनीनं मुलांसाठी चारचाकी सायबरक्वाड लॉन्च केली आहे. इलेक्ट्रिक सायबरक्वाडला लोकांकडून पसंती मिळताना दिसत आहे. टेस्लाच्या वेबसाईटवरून सायबरक्वाडची विक्री केली जात आहे. सायबरक्वाड एका प्लेकारसाठी दिसते. त्यामुळे मुलांमध्ये सायबरक्वाडचं आकर्षण आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन सायबरक्वाड ८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी तयार करण्यात आली आहे.

सायबरक्वाड बाइकची डिझाइन सायबरट्रकपासून प्रेरणा घेत तयार केल्याचं दिसतंय. सायबरक्वाड तयार करण्यासाठी स्टील फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. तसेच चालवण्यासाठी आरामदायी वाटावं म्हणून उत्तम आसनव्यवस्था दिली आहे. गाडीला डिस्क ब्रेक आणि एलईडी लाइटसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. सायबरक्वाडमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला आहे. त्यामुळे २४ किमी अंतर कापू शकते. गाडीचा वेग प्रतितास १६ किमी आहे. तसेच आवश्यकता असल्यास पालकांकडून वेग कमी केला जाऊ शकतो. सायबरक्वाडमध्ये तीन स्पीड सेटिंग्स आहेत गाडी चार्ज होण्यासाठी ५ तासांचा अवधी लागतो. एका चार्जिंगनंतर गाडी किती धावणार हे वापरकर्त्याच्या वजन आणि रायडिंग शैलीवर अवलंबून आहे.

Kavya Maran’s car collection
सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन सारखंच ग्लॅमरस आहे तिचं कार कलेक्शन; किंमत वाचून फुटेल घाम
Maruti Suzuki Grand Vitara Waiting Period
मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारसमोर Wagon R ही विसरुन जाल! खरेदीसाठी मोठी गर्दी; मायलेज २७ किमी, वेटिंग पीरियड पोहोचला…
Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Volkswagen India has launched the Taigun GT Line and Taigun GT Plus Sport konw features and prices
कुटुंबाला साजेशी SUV पण लूक एकदम Sporty! Volkswagen च्या ‘या’ गाड्यांची किंमत व फीचर्स एकदा पाहाच

बजाज दुचाकींची मागणी वाढली; हिरो मोटोकॉर्पला मागे टाकत अव्वल स्थानी

सायबरक्वाडची किंमत १९०० अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजेच जवळपास १.४२ लाख रुपये असेल. येत्या दोन ते तीन आठवड्यात सायबरक्वाडची डिलिव्हरी सुरू होणार आहे.