तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्वस्तात कार खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या माहिन्यात मारुती सुझुकीच्या या चार कार खरेदीवर भरघोस सवलत मिळणार आहे. मारुती सुझुकी नेक्सा डीलर्स या महिन्यात जवळपास सर्व मॉडेल्सवर आकर्षक ऑफर देत आहेत. जिमनी आणि फ्रॉन्क्स सारख्या SUV वरील सवलती किंचित वाढल्या आहेत, तर Grand Vitara आणि Ciaz वर गेल्या महिन्यापासून काही सवलती मिळत आहेत. XL6 आणि Baleno मिळणारी सवलत किंचित कमी झाली आहे.

मारुती सुझुकी जिमनीवर २.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार (Maruti Suzuki Jimny gets up to Rs 2.5 lakh discount) :

जिमनी (सौजन्य -मारुती सुझुकी)

मारुती सुझुकी जिमनीवर सर्वाधिक सवलत मिळत आहे. या कारच्या अल्फा व्हेरियंटवर २.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते आहे, तर Zeta व्हेरियंटवर १.९५ लाख रुपयांची सूट दिली जात आहे. ऑफ रोडरच्या Zeta व्हेरिएंटवर मिळणारी सवलत गेल्या महिन्याच्या तुलनेत ४५,००० रुपयांनी वाढली आहे. ही SUV ब्रँडची खास ऑफर आहे आणि ती थार आणि गुरखा (Thar and Gurkha) यांच्याशी स्पर्धा करते.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा वर १.२८ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते (Maruti Suzuki Grand Vitara gets up to Rs 1.28 lakh discount)

ग्रँड विटारा (सौजन्य -मारुती सुझुकी)

मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा या कारवर देखील चांगली सवलत दिली जात आहे. गेल्या महिन्याप्रमाणेच या महिन्यातही खास ऑफर दिली जात आहे. या कारच्या स्टॉँग हायब्रिड रेंजच्या खरेदीवर १.२८ लाख रुपयांची सवलत मिळणार आहे. सौम्य हायब्रीड रेंजच्या खरेदीवर तुम्हाला ७३,१०० रुपयांची सूट मिळणार आहे आणि ग्रँड विटारा सीएनजी कारवर तुम्हाला सुमारे ३३,१०० रुपयांची सूट मिळणार आहे.

मारुती सुझुकी बलेनोवर ५,००० रुपयांची सूट (Maruti Suzuki Baleno discounts down by Rs 5,000)

बलेनो (सौजन्य – मारुती सुझुकी)

मारुती सुझुकीची प्रसिद्ध कार लोकप्रिय बलेनोवर मिळणारी सवलती गेल्या महिन्यांच्या तुलनेत ५,००० रुपयांनी कमी झाली आहेत. तरीही या महिन्यात या कारच्या मॅन्युअल गिअरबॉक्स सुसज्ज व्हेरियंटवर ४७,१०० रुपयांची सवलत मिळणार आहे तर, ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर ५२,१०० रुपयांची सवलत मिलणार आहे. तसेच CNG मॉडेलवर ३७१०० रुपयांची सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा – Kia launches Sonet Gravity: गणेशोत्सवात कार घ्यायचीय? KIAने केली सोनेट ग्रॅव्हिटी लॉंच, किंमत वाचून व्हाल थक्क

मारुती फ्रॉन्क्स सवलती सप्टेंबर २०२४ साठी वाढल्या आहेत (Maruti Fronx discounts increased for September 2024)

फ्रॉन्क्स (सौजन्य -मारुती सुझुकी)

मारुतीच्या फ्रॉन्क्स टर्बोवरील मिळणारी सवलत गेल्याा महिन्याच्या तुलतने या महिन्यात किंचित वाढली आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या खरेदीवर तुम्हाला एकूण रु. ८३ लाखांची फायदा मिळतो, ज्यात रु. ४०,००० किंमतीच्या Fronx Velocity Edition पॅकेजचा समावेश आहे.

या महिन्यात १.२ लिटर पेट्रोल फ्रॉन्क्सवर ३५,००० रुपयांची सूट दिली जात आहे आणि १.२ लिटर पेट्रोल सिग्माच्या खरेदीवर तुम्हाला ३२,५०० रुपयांचे फायदे मिळणार आहे. डेल्टा, डेल्टा प्लस आणि डेल्टा प्लस (ओ) प्रकारांमध्ये प्रत्येकी ३०,००० रुपयांची सूट आहे. Fronx CNG सर्व प्रकारांमध्ये रु. १०,००० सूटसह उपलब्ध आहे.

हेही वाचा –मारुतीची कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! CNG कार ‘या’ दिवशी होणार लाँच; वाचा किंमत, फीचर्स

मारुती सुझुकी इग्निसवर सप्टेंबर २०२४ साठी सूट (Maruti Suzuki Ignis discounts for September 2024)

इग्निस( सौजन्य- मारुती सुझुकी)

संपूर्ण इग्निस ऑटोमॅटिक लाइन अपवर या महिन्यात ५३,१०० रुपयांची सूट मिळते. इग्निस सिग्मा एमटीसाठीही रक्कम समान आहे. डेल्टा, झेटा आणि अल्फा (MT) यांना सुमारे ४८,१००रुपयांचे फायदे मिळतात.

हेही वाचा – गणेश चतुर्थीला Yamaha ची दुचाकी आणा घरी; भरपूर कॅशबॅक मिळणार; कधीपर्यंत ‘ही’ ऑफर असणार?

मारुती सुझुकी सियाझ सवलतींमध्ये बदल नाही (Maruti Suzuki Ciaz discounts remain unchanged)

सियाझवरील सवलती गेल्या महिन्याप्रमाणेच सुरू आहेत. सर्व प्रकार ४५,००० रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह उपलब्ध आहेत, ज्यामध्ये २०,००० रुपयांची रोख सूट आणि २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे.

सियाझ (सौजन्य -मारुती सुझुकी)

मारुती सुझुकी XL6 सवलती सप्टेंबर २०२४ साठी कमी केल्या (Maruti Suzuki XL6 discounts reduced for September 2024)

XL6 (सौजन्य – मारुती सुझुकी)

XL6 वर ऑफर आणि सवलती देखील थोड्या कमी झाल्या आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या कारवर ३५,००० रुपये सूट मिळते, तर CNG कारव या महिन्यात २५,००० रुपयांचे फायदे मिळतात.