Premium

५.९९ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, छप्परफाड विक्रीमुळे वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर

तुम्ही देखील मारुतीची सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबाव लागणार आहे.

Maruti Car Waiting Period
मारुतीच्या कारवर ग्राहक फिदा (Photo-financialexpress)

भारतीय वाहन बाजार हा जगातल्या टॉप ५ वाहन बाजारांपैकी एक आहे. मारुती ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. भारतीय वाहन बाजारावर मारुती सुझुकी या कंपनीचं गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते पहिल्या क्रमांकावर आहे. मारुतीच्या गाड्या घेण्यासाठी ग्राहकांची शोरुमसमोर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मारुतीच्या एका कारला प्रचंड मागणी दिसून येत आहे. सध्या या कारसाठी चार महिन्याचा वेटिंग पिरियड (प्रतिक्षी कालावधी) आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुतीच्या ‘या’ कारला बाजारात सर्वाधिक मागणी

मारुतीची स्विफ्ट बाजारात सर्वाधिक विकली जाते. जी आजपासूनच नव्हे तर प्रदीर्घ काळापासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. जर तुम्ही मारुती स्विफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थांबावं लागणार आहे. या कारचा प्रतीक्षा कालावधी ४ महिन्यांपेक्षा जास्त आहे

मारुती सुझुकी स्विफ्ट ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. या कारच्‍या जास्त मागणीमुळे, काही शहरांमध्ये अजिबात प्रतीक्षा कालावधी नाही, परंतु काही शहरांमध्ये या कारचा प्रतीक्षा कालावधी चार महिन्यांहून अधिक आहे.

(हे ही वाचा : सणासुदीत आनंद महिंद्रांनी ग्राहकांना दिला धक्का! सात सीटर कारसहित ‘या’ अनेक लोकप्रिय गाड्यांच्या वाढवल्या किमती )

किंमत

या कारची लांबी ३,८४५ मिमी, रुंदी १,७३५ मिमी आणि उंची १,५३० मिमी आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स १६३ मिमी आणि व्हीलबेस २,४५० मिमी आहे. या कारमध्ये तुम्हाला २६८ लीटर बूट स्पेस मिळते. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी स्विफ्ट २२.३८ किमी प्रति लिटर (MT) आणि २२.५६ किमी प्रति लिटर (AMT) मायलेज देते. मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The countrys largest carmaker maruti suzuki car swift waiting period up to 4 months pdb

First published on: 25-09-2023 at 15:48 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 25 September: ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, टाकी फुल्ल करण्याआधी इथे पाहा दर