Tata Tiago EV Deliveries Begin in India: Tata Motors ने अलीकडेच देशात आपली नवीन Tiago EV लाँच केली आहे. सध्या, ही इलेक्ट्रिक सेगमेंटमधील देशातील सर्वात स्वस्त कार आहे. नवीन Tiago EV लाँच झाल्यापासून २०,००० हून अधिक बुकिंग प्राप्त झाले आहेत. कंपनीकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, ज्या खरेदीदारांनी नवीन Tiago EV बुक केले आहे त्यांना हे वाहन दिले जात आहे.

Tata Tiago EV: बुकिंग आणि डिलिव्हरी

Tata Tiago EV चे बुकिंग गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उघडले होते. कंपनीला एका दिवसात या नवीन इलेक्ट्रिक कारसाठी १०,००० बुकिंग मिळाले आहेत. बुकिंग उघडण्याच्या वेळी, टाटा ने नवीन Tiago EV पहिल्या १०,००० खरेदीदारांना प्रास्ताविक एक्स-शोरूम किंमतीवर विकण्याची ऑफर दिली. नंतर, कंपनीने ही ऑफर पहिल्या २०,००० खरेदीदारांना सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीवर वाढवण्याची घोषणा केली. सध्या, कंपनीने बुकिंग केलेल्या ग्राहकांना नवीन ईव्ही पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. टाटा मोटर्सने पहिल्या बॅचमध्ये इलेक्ट्रिक कार Tiago EV २००० खरेदीदारांना दिली आहे.

8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?
new hiring at IGI Aviation Bharti 2024
IGI Aviation recruitment 2024 : कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी मोठी भरती! पाहा अर्ज प्रक्रिया

(हे ही वाचा : दमदार फीचर्स अन् डिझाईनसह Hyundai Creta देशात सादर, मिळेल तगडं मायलेज, किंमत… )

Tata Tiago EV: बॅटरी, रेंज आणि चार्जिंग वेळ

नवीन Tiago EV ला दोन प्रकारच्या बॅटरी मिळतात. ९.२ kWh आणि २४ kWh. ९.२ kWh क्षमतेची बॅटरी ६० bhp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. २४ kWh क्षमतेची बॅटरी ७४ bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की, Tiago EV एकाच चार्जवर २५०-३१५ किमीची रेंज देईल. चार्जिंगच्या वेळेबद्दल सांगायचे तर, फास्ट चार्जरच्या मदतीने कारमध्ये बसवलेली बॅटरी एका तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होऊ शकते. टाटाच्या नवीन कारमध्ये लावलेली बॅटरी सामान्य चार्जरने चार्ज करण्यासाठी ८ तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

Tata Tiago EV: किंमत आणि स्पर्धा

नवीन Tata Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत ८.४९ लाख ते ११.४९ लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक कारशी थेट स्पर्धा करू शकणारे कोणतेही वाहन भारतात नाही. तथापि, Tigor EV आणि Nexon EV Prime सारख्या कंपनीच्या स्वतःच्या काही कार टाटा Tiago EV शी स्पर्धा करू शकतात. देशातील १३३ शहरांमध्ये नवीन Tiago EV ची विक्री सुरू झाली आहे.