scorecardresearch

महागडी बाईक अन् तितकाच महागडं हेल्मेट…’हा’ धोनीचा लय भारी रुबाब पाहिलात का?

MS Dhoni Bike Riding: धोनीचा ‘या’ सुपरबाईकवरील बाईक रायडींगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MS Dhoni Bike Riding
धोनीचा रांची स्टेडियमधील व्हायरल VIDEO(Photo-instagram msdhoni.zealot)

MS Dhoni On TVS Apache RR310: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी बहुधा भारतातील अशा मोजक्या सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांच्याकडे मोटारसायकलींचा प्रभावी संग्रह आहे. त्यांच्याकडे कमी किमतीच्या आणि कमी क्षमतेच्या मॉडेल्सपासून ते विंटेज आणि आधुनिक सुपरबाईकपर्यंतचे उत्कृष्ट बाईक संग्रह आहे. क्रिकेट सराव सत्रापासून ते घरी मोटारसायकल चालवताना या माजी क्रिकेटपटूला अनेक वेळा रस्त्यावर पाहिले गेले आहे. तो अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जो क्वचितच चारचाकी वापरतो.

अलीकडेच, एमएस धोनी आयपीएलच्या आगामी आयपीएल २०२३ हंगामासाठी सराव सुरू केला आहे आणि त्याचासाठी तो त्याच्या TVS Apache RR310 बाईकवरुन रांची स्टेडियमवर पोहोचला असून त्याचा हा बाईक रायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्लेखनीय आहे की, एमएस धोनी पहिल्यांदाच टीव्हीएस बाईकवर दिसला. यादरम्यान धोनी एजीव्ही हेल्मेट घालून स्पोर्ट्सबाईक चालवत होता, ज्याची किंमत मोटारसायकलच्या निम्मी आहे.

(हे ही वाचा : रस्त्यावर सुसाट पळणारी कार, छतावर बसलाय कुत्रा, अन् त्या नंतर जे घडलं ते पाहून भडकले नेटकरी )

TVS Apache RR310 कशी आहे खास?

TVS Apache RR 310 (टीवीएस अपाचे आरआर 310) भारतात २०२१ मध्ये लाँच झाली आहे. हे BMW आणि TVS मधील भागीदारीचे उत्पादन आहे. फुल-फेअर मोटरसायकल लाँच झाल्यापासून खूप प्रशंसा मिळाली आहे. तीक्ष्ण आणि आक्रमक शैली असलेली ही ब्रँडची पहिली पूर्ण-फेअर बाईक आहे. ही बाईक BMW G310 R आणि G310 RR सारखी बनवण्यात आली आहे. Apache RR 310 ही परवडणाऱ्या विभागातील सर्वात वेगवान मोटरसायकल म्हणून ओळखली जाते. हे 313 cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे जे ३३.५ bhp आणि २७.३ Nm टॉर्क निर्माण करते.

धोनीकडे बाईकचे उत्तम कलेक्शन

Apache RR 310 ही एमएस धोनीच्या मालकीच्या अनेक बाईकपैकी एक आहे. त्याच्याकडे काचेचे बनलेले मेगा गॅरेज आहे आणि त्यात १५० हून अधिक मोटारसायकली आहेत. संग्रह विविध श्रेणीत आहे आणि त्यात विंटेज मॉडेल्सपासून आधुनिक स्पोर्ट्सबाईकपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.


मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 14:12 IST
ताज्या बातम्या