दमदार फीचर्स अन् डिझाईनसह Hyundai Creta देशात सादर, किंमत | The new 2023 Hyundai Creta has been launched in India at a starting price of Rs 10 84 lakh ex-showroom | Loksatta

दमदार फीचर्स अन् डिझाईनसह Hyundai Creta देशात सादर, मिळेल तगडं मायलेज, किंमत…

Hyundai Creta: Hyundai Creta SUV कारमध्ये तुम्हाला जबरदस्त सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत.

Hyundai Creta
Hyundai Creta देशात लाँच (Photo-financialexpress)

2023 Hyundai Creta Launched: Hyundai Motor India ने आज ३ फेब्रुवारी त्यांची SUV लाइनअप अपडेट केली आहे. Hyundai Motor India ने अनेक बदलांसह क्रेटा बाजारात आणली आहे. यामध्ये ग्राहकांना जुन्या Creta कारपेक्षा अधिक फीचर्स देण्यात आले आहेत.

Hyundai Creta SUV अपडेटेड कशी असेल खास?

Hyundai Motor India ने RDE (Real Driving Emmison) नियमांचे पालन करण्यासाठी तीन SUV चे इंजिन अपग्रेड केले आहेत. विशेष म्हणजे या वर्षी एप्रिलपासून भारतात RDE नियम लागू केले जाणार आहेत. यासोबतच हे वाहन E20 इंधनासाठी तयार असेल. यात ११३ bhp -litre, ११३ bhp १.५ लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल. खरेदीदार त्यांच्या सोयीनुसार इंजिन निवडू शकतात. तथापि, १३८ Bhp १.४-लीटर टर्बो पेट्रोल मोटर बंद करण्यात आली आहे. Hyundai कडून ऑफरवर अनेक ट्रान्समिशन पर्याय आहेत, ज्यात ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, IVT आणि ६-स्पीड AT यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा : Mahindra Electric Cars: महिंद्राच्या ‘या’ नवीन इलेक्ट्रिक कार भारतात येणार, पाहून तुम्हालाही लागेल वेड )

Hyundai Creta सनरूफसह आकर्षक दिसेल

सुरक्षेचा विचार करता Hyundai Creta मध्ये आता सहा एअरबॅग्ज असतील. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्सही पाहायला मिळतील. एवढेच नाही तर Hyundai Creta मध्ये अँड्रॉइड ऑटो, Apple CarPlay, कनेक्टेड कार टेक आणि सनरूफ इत्यादीसह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट असेल.

Hyundai Creta किंमत

नवीन 2023 Hyundai Creta पेट्रोल व्हेरियंटची किंमत १०.८४ लाख ते १७.६४ लाख रुपये आहे, तर त्याच्या डिझेल व्हेरिएंटची किंमत ११.८९ लाख ते १९.१३ लाख रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे, जी Kia Seltos, Tata Harrier शी स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 19:33 IST
Next Story
Maruti च्या ‘या’ SUV चा देशभरात जलवा, आता इलेक्ट्रिक अवतारातही होणार लाँच, पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन