Hyundai Verna 2023 Launched: Hyundai ने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षित अपडेटेड Verna सादर केली. कंपनीने आपली नवीन जनरेशन Hyundai Verna (2023 Hyundai Verna) लाँच केली आहे. Verna पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेत २००६ मध्ये सादर करण्यात आली होती आणि आता त्याचे नेक्स्ट जरेशन मॉडेल लाँच करण्यात आले आहे. नवीन Hyundai Verna ही मध्यम आकाराची सेडान आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी ह्युंदाईची नवीन कार ठळक डिझाइनसह सादर करण्यात आली आहे. कंपनीची नवीनतम कार अनेक नवीन वैशिष्ट्यांनी सज्ज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hyundai Verna 2023 मध्ये काय आहे खास?

नव्या Hyundai Verna मध्ये ADAS 2 फीचर दिसत आहे. सहाव्या जनरेशनमधील Hyundai ची नवीन Verna sedan ४ प्रकार आणि ७ रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहे. Hyundai ने नवीन Verna कारमध्ये २ प्रकारचे इंजिन दिले आहे. ट्रान्समिशनसाठी इंजिनसोबत जोडलेला गिअरबॉक्स ३ प्रकारचा आहे. कंपनीचा दावा आहे की ही नवीन Verna १८.६० kmpl ते १९.६० kmpl मायलेज देईल.

(हे ही वाचा : देशातील बेस्ट सेलिंग ​७-सीटर SUV खरेदी करा Nexon च्या किमतीत, हजारो ग्राहक लागले रांगेत )

Hyundai Verna 2023 ‘या’ कारना देणार जोरदार टक्कर

नवीन Hyundai Verna संपूर्ण LED लाइट बार आहे. बोनेट आणि बंपरमध्ये थोडा फरक आहे. यात मोठ्या आकाराचे ड्युअल टोन अलॉय व्हील देण्यात आले आहेत. नवीन व्हर्ना देशांतर्गत बाजारात होंडा सिटी, स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन व्हरटस आणि मारुती सुझुकी सियाझ यांना टक्कर देईल.

HMI चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) Unsoo किम म्हणाले की, ‘Verna’ हे जागतिक स्तरावर कंपनीच्या सर्वात प्रतिष्ठित मॉडेलपैकी एक आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात सेडानच्या ४.६५ लाख युनिट्सची विक्री केली आहे. त्याचवेळी, या मॉडेलच्या सुमारे ४.५ लाख युनिट्सची निर्यात देखील झाली आहे.

2023 Hyundai Verna: प्रकार आणि किमती

नवीन Hyundai Verna ज्यामध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे नियमित इंजिनसह मॅन्युअल गिअरबॉक्स आणि स्वयंचलित गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. त्याचवेळी, टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज नवीनतम Hyundai Verna मॅन्युअल गिअरबॉक्स आणि DCT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. इंजिन आणि गिअरबॉक्सच्या आधारावर वेगवेगळ्या व्हेरियंटच्या किमतीही भिन्न असतात.

2023 Hyundai Verna १०,८९,९०० रुपयांच्या प्रारंभिक किमतीत लाँच केली आहे. त्याच्या टॉप-स्पेक SX (O) 7DCT प्रकाराची किंमत १७.३८ लाख (एक्स-शोरूम) आहे. नवीन कारचे बुकिंग सुरू झाले आहे. नवीन Hyundai Verna कार बुक करण्यासाठी खरेदीदारांना २५,००० रुपयांचे टोकन घ्यावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The next generation 2023 hyundai verna launched in india starting at rs 10 90 lakh pdb
First published on: 22-03-2023 at 11:02 IST