Mahindra Thar 4X2 Price Hike: महिंद्रा आणि महिंद्राने या वर्षी जानेवारीमध्ये बहुप्रतिक्षित थार 4X2 सादर केले. थारचा RWD प्रकार ९.९९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम प्रारंभिक किंमतीत लाँच करण्यात आला. आता, लाँच झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत, थार 4X2 ची किंमत प्रथमच वाढवण्यात आली आहे. महिंद्रा थार १.५ डिझेल 4X2 ची किंमत प्रथमच वाढवण्यात आली आहे. कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी डीलरच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

Mahindra Thar ची किती वाढली किंमत? 

महिंद्रा थारची रियर-व्हील ड्राइव्ह आवृत्ती तीन प्रकारांमध्ये देत आहे. कंपनीने LX RWD डिझेल MT व्हेरियंटची किंमत ५०,००० रुपयांनी वाढवली आहे तर इतर व्हेरियंटच्या किमतीत बदल केलेला नाही. वृत्तानुसार, थारचे १.५-लिटर डिझेल इंजिन आता RDE अनुरूप आहे आणि हेच दरवाढीचे कारण आहे. Mahindra Thar 4X2 ची सध्या किंमत ९.९९ लाख ते १३.४९ लाख रुपये आहे. दुसरीकडे, महिंद्र थारच्या 4X4 प्रकारची किंमत १३.५९ लाख ते १६.४९ लाख रुपयांपर्यंत आहे, सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
What is the hottest place on earth
पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?

(हे ही वाचा : Toyota Fortuner चे धाबे दणाणले, ‘मेड इन इंडिया’ सर्वात स्वस्त SUV ची वाढली मागणी, किंमत १२.७४ लाख )

महिंद्रा थार 4X2 इंजिन आणि गिअरबॉक्स

Mahindra Thar 4X2 (RWD) ला एक नवीन ११७ bhp १.५-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात २.०-लिटर टर्बो पेट्रोल मोटर देखील मिळते जी ६-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर AT शी जुळते. दुसरीकडे, 4X4 प्रकारात, २.२-लीटर ऑइल-बर्नर आणि २.०-लीटर टर्बो पेट्रोल मोटर मिळते, जी ६-स्पीड MT आणि ६-स्पीड AT शी जोडलेली आहे.

Mahindra Thar 4X2 वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, हॅलोजन हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, इलेक्ट्रिकली कंट्रोल्ड एसी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, धुता येण्याजोगे फ्लोअर, डिटेचेबल रूफ पॅनेल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. .

महिंद्र थार 4X2 सुरक्षा वैशिष्ट्ये

सुरक्षितता लक्षात घेऊन समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स आणि फ्रंट सीट बेल्ट रिमाइंड यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.