जगातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात होणार नाही लॉंच; जाणून घ्या यामागची मुख्य कारणे

जीडब्ल्यूएमच्या भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयामुळे जवळपास ८ हजार कोटींचा बांधकाम प्रकल्प बंद होईल.

GWM SUV Haval F7 will not be launched in India
हा व्यवसाय बंद होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.(फोटो : GWM Global)

ग्रेट वॉल मोटर (GWM), चीनची सर्वात मोठी एसयूव्ही निर्माती कंपनीने २०२२ ऑटो एक्सपोमध्ये भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचे प्रदर्शन केले. या ईव्हीच्या सादरीकरणासह, कंपनी भारतात विस्तार करण्याचा विचार करत होती. कंपनीने प्रीमियम मध्यम आकाराच्या SUV Haval F7 ने आपला प्रवास सुरू केला. त्यावेळी कोविड१९ महामारी आणि भारत आणि चीन यांच्या सीमेवरील संबंधांमुळे जीडब्ल्यूएमच्या भारतात प्रवेशाला ब्रेक लागला. मात्र, अडीच वर्षानंतर एफडीआय मंजुरी न मिळाल्याने कंपनीने या योजनेतून माघार घेतली आहे.

जीडब्ल्यूएमच्या भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयामुळे जवळपास ८ हजार कोटींचा बांधकाम प्रकल्प बंद होईल, ज्यामध्ये तळेगाव, पुणे येथे जनरल मोटर्स प्लांट उभारण्याची आणि हजारो नोकऱ्या निर्माण करण्याच्या योजनांचा समावेश आहे. हा व्यवसाय बंद होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

मोबाईल चोरीला गेल्यावर बँक डिटेल्स आणि मोबाईल वॉलेटचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • जून २०२० मध्ये गलवान व्हॅलीमध्ये चिनी आणि भारतीय सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर, भारताने चिनी गुंतवणुकीची जोरदार तपासणी केली आणि सुरक्षा धोक्यांचे कारण देत हजारो चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली.
  • भारताच्या सीमेशी जोडलेल्या देशांकडून देण्यात आलेल्या प्रस्तावांची स्क्रीनिंग वाढवण्यासाठी एफडीआय नियमांमध्ये सुधारणा केल्यापासून भारतात अब्जावधी डॉलर्सचे थेट परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. जीडब्ल्यूएम हा असाच एक प्रकल्प होता ज्याला गेल्या दोन वर्षांपासून मंजुरी प्रलंबित होती.
  • भारत सरकारने हवाल एच६ क्रॉसओवरला सीबीयूद्वारे भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याबाबत असहमती दर्शविली होती.
  • चिनी उत्पादनांची भारतीय बाजारपेठ ही तशी सकारात्मक प्रतिमा नाही. चिनी उत्पादने स्वस्त असली तरी ते त्यांच्या लवकर खराब होण्यासाठी ते कुप्रसिद्ध आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The worlds cheapest electric car gwm suv haval f7 will not be launched in india find out the main reasons behind this pvp

Next Story
Petrol-Diesel Price Today: ४ जुलै रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचा दर किती? जाणून घ्या
फोटो गॅलरी