देशातील दुचाकी क्षेत्रातील उत्तम स्कूटरपैकी आज आम्ही अशा स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत ज्या त्यांच्या वजनाने आणि आकर्षक डिझाइनमुळे महिलांना खूप आवडतात. तुम्ही तुमच्यासाठी हलक्या वजनाची स्कूटर शोधत असाल. तर इथे तुम्हाला देशातील टॉप ३ लोकप्रिय स्कूटर्सची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल ज्या त्यांच्या कमी वजन आणि कमी बजेटमुळे लोकांना खूप आवडतात.

टीवीएस स्कूटी पेप प्लस (TVS Scooty Pep Plus)

ही अतिशय कमी वजनाची स्कूटर आहे जी कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात उपलब्ध आहे. या स्कूटीला ८७.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे ५.४ पी येस पॉवर आणि ६.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते . या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत, ज्यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल

( हे ही वाचा: स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी नवीन मारुती सेलेरियो कार भारतात लाँच! )

स्कूटीच्या मायलेजवर, टीवीएस दावा करते की ते शहरात ५८ किलोमीटर प्रति लीटर आणि हायवेवर ७६ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI प्रमाणित आहे. टीवीएस स्कूटी पेप प्लसची किंमत ५७,९५९ रुपयांपासून सुरू होते जी टॉप मॉडेलमध्ये ६०,८५९ रुपयांपर्यंत जाते.

टीवीएस स्कूटी जेस्ट (TVS Scooty Zest)

ही कंपनीची दुसरी हलक्या वजनाची स्कूटर आहे जी दोन प्रकारांसह लॉंच करण्यात आली आहे. स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर १०९७ सीसी इंजिन आहे जे ७.८१ पीएस पॉवर आणि ८.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

(हे ही वाचा: देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार; किंमत पाच लाखांपेक्षाही कमी )

या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये ट्यूबलेस टायर्ससह पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल, टीवीएस दावा करते की ही स्कूटी झेस्ट ६२ किलोमीटर प्रति लीटर चं मायलेज देते, स्कूटी झेस्टची सुरुवातीची किंमत ६४,६४१ रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ६६,३१८ रुपयांपर्यंत जाते.

हीरो प्लेजर प्लस (Hero Pleasure Plus)

कंपनीने नवीन एक्सटेक (Xtec) अवतारात लॉंच केला आहे, जो पाच प्रकारांसह बाजारात लॉंच करण्यात आला आहे.हीरो प्लेजर प्लसमध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर ११०.९ सीसी इंजिन दिले आहे जे ८.१ पीएस पॉवर आणि ८.७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

( हे ही वाचा: Hyundai Aura vs Honda Amaze: कमी बजेटमध्ये अधिक परवडणारी आणि स्टायलिश सेडान कोणती? जाणून घ्या )

या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत, ज्यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत, मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ६३ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत ६१,९०० रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ६९,५०० रुपयांपर्यंत जाते.