scorecardresearch

Best electronic Vehicle : ‘या’ आहेत १५ लाखांच्या आतील उत्तम इलेक्ट्रिक कार; पाहा यादी

दिवाळीला नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर १५ लाखांच्या आतील उत्तम इलेक्ट्रिक कार कोणत्या आहेत जाणून घ्या.

Best electronic Vehicle : ‘या’ आहेत १५ लाखांच्या आतील उत्तम इलेक्ट्रिक कार; पाहा यादी
(Photo : Tata Motors)

पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी वाढत आहेत. अशात अनेकजण महागाईचा विचार करून इलेक्ट्रिक गाडयांकडे वळत आहेत. तुम्ही देखील दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही जर इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर १५ लाखांच्या आतील उत्तम कार कोणत्या आहेत जाणून घ्या.

टाटा टियागो ईव्ही

 • ‘टाटा’ने २८ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत टियागो इव्ही लाँच केली आहे.
 • ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.
 • या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीने दोन बॅटरी पॅकचा पर्याय दिला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार १९.२ KWH बॅटरीसह कार एका चार्जमध्ये २५० किलोमीटरपर्यंत चालवता येते. याशिवाय २४ KWH च्या मोठ्या बॅटरीसह, एका चार्जमध्ये ३१५ किलोमीटर चालवता येते.
 • ७.२ किलोवॅट चार्जरने कार ३ तास ३६ मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होऊ शकते आणि डीसी फास्ट चार्जर वापरल्यास ५७ मिनिटांमध्ये १० ते ८० टक्के चार्ज होते.
 • या कारमध्ये ऑटो एसी, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पंक्चर रिपेअर किट आणि कनेक्टेड कार टेक सारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत.
 • याशिवाय ही कार एनसीपीएद्वारे चार स्टार असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
 • स्पोर्ट्स मोड, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, आय टीपीएमएस यांसारखे फीचर्स या इलेक्ट्रिक कारमध्ये उपलब्ध आहेत.
 • या कारची एक्स-शोरूम किंमत ८.४९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ११.७९ लाख रुपये आहे.
 • जर तुम्हाला ही कार बुक करायची असेल तर १० ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होणार आहे आणि कंपनी पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ पासून या कारची डिलिवरी सुरू करणार आहे.

आणखी वाचा : ‘ग्रँड विटारा’नंतर टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

टाटा टिगोर इव्ही

 • टाटाची इलेक्ट्रिक कार टिगोर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • टिगोरची एक्स-शोरूम किंमत १२.४९ लाख रूपये आणि टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १३.६४ लाख रूपयांपासून सुरू होते.
 • कंपनीच्या माहितीनुसार टिगोर ईव्ही एका चार्जवर ३०६ किमीची रेंज देते.
 • फास्ट चार्जरने कार केवळ ६५ मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते. तर पॉवर सॉकेटमधून कार चार्ज करण्यासाठी ८ तास ४५ मिनिटे लागतात.
 • याला एनसीएपीकडून ४ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. कारच्या बॅटरीला आयपी६७ सर्टीफाइड रेटिंग मिळाली आहे. सुरक्षेसाठी कारमध्ये ड्युअल एअरबॅग देण्यात आले आहेत.

टाटा नेक्सॉन इव्ही

 • नेक्सॉनची ईव्ही प्राइम ही देशातील तिसरी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.
 • याची एक्स-शोरूम किंमत १४.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १७.५० लाख रुपये आहे.
 • नेक्सॉनमध्ये ईव्ही मॅक्स, डार्क एडिशन आणि जेट एडिशन देखील उपलब्ध आहेत. या एडिशनच्या किंमती वेगवेगळ्या आहेत.
 • नेक्सॉन इव्ही फास्ट चार्जरने ६० मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते आणि सामान्य चार्जिंग पॉइंटवरून चार्ज केल्यास ९ तास १० मिनिटांत १० ते ९० टक्के चार्ज होते.
 • इलेक्ट्रिक कार असुनही ही गाडी शून्यावरून १०० किमीचा वेग ९.९ सेकंदात गाठते.
 • सुरक्षेच्या दृष्टीने कारला पूर्ण फाईव्ह स्टार देण्यात आले आहेत.
 • या कारमधील बॅटरीला आयपी ६७ रेटिंग मिळाले आहे.
 • यात क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, स्मार्ट वॉच इंटिग्रेशन, मल्टी-मोड रिजनसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या