scorecardresearch

अवघ्या ४ लाखांच्या बजेटमध्ये उत्तम बजेट देणाऱ्या ‘या’ आहेत टॉप ३ कार!

तुमच्या कमी बजेटमध्ये बसू शकणार्‍या देशातील टॉप ३ स्वस्त कारचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

अवघ्या ४ लाखांच्या बजेटमध्ये उत्तम बजेट देणाऱ्या ‘या’ आहेत टॉप ३ कार!
बजेट कार (प्रातिनिधिक फोटो)

देशातील कार क्षेत्रात जास्त मायलेज असलेल्या कमी बजेटच्या कारची विस्तृत श्रेणी आहे, ज्यामध्ये मारुती, टाटा, ह्युंदाई, डॅटसन, रेनॉल्ट सारख्या कंपन्यांच्या स्वस्त आणि परवडणाऱ्या कार आहेत. तुम्ही खूप कमी बजेटमध्ये स्वत:साठी उत्तम मायलेज असलेली कार शोधत असाल, तर तुमच्या कमी बजेटमध्ये बसू शकणार्‍या देशातील टॉप ३ स्वस्त कारचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

मारुती अल्टो ८०० (Maruti Alto 800)

मारुती अल्टो ८०० ही या देशातील सर्वात स्वस्त कार आहे जी तिच्या मजबूत मायलेजसाठी ओळखली जाते, जी कंपनीने आठ व्हेरीयंटमध्ये लॉंच केली आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने त्यात ७९६ cc इंजिन दिले आहे, जे ४८ PS पॉवर आणि ६८ Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

(हे ही वाचा: प्रीमियम फीचर्स, कमी किमतीत आणि जास्त मायलेज असलेल्या ‘या’ आहेत भारतातील टॉप ३ कार!)

मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार २२.०५ किमी प्रति लीटर मायलेज देते आणि सीएनजीवर हे मायलेज ३१.५९ किमी प्रति किलो होते. मारुती अल्टो ८०० ची सुरुवातीची किंमत ३.१५ लाख रुपये आहे, टॉप व्हेरियंटमध्ये जाताना ती ४.८२ लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती एस्प्रेसो (Maruti S Presso)

मारुती एस्प्रेसो ही त्यांच्या कंपनीची सर्वात स्वस्त मिनी एसयूव्ही आहे, जी कंपनीने तीन ट्रिमसह लॉन्च केली आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात ९९८ cc चे इंजिन आहे जे ६८ PS ची पॉवर आणि ९० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते, ज्यामध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, याशिवाय कीलेस एंट्री, फ्रंट पॉवर विंडो, ड्रायव्हरच्या सीटवर एअरबॅग, ABS, EBD सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

(हे ही वाचा: Hero Pleasure Plus vs Honda Activa 6G: किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणता आहे सर्वोत्तम पर्याय? जाणून घ्या)

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार पेट्रोलवर २१.४ kmpl चा मायलेज देते पण CNG वर हे मायलेज ३१.२ kmpl पर्यंत वाढते. मारुती एस्प्रेसोची सुरुवातीची किंमत ३.७८ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना ५.४३ लाख रुपयांपर्यंत जाते.

डैटसन रेडी गो (Datsun Redi GO)

डैटसन रेडी गो ही त्यांच्या कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे, जी कंपनीने सहा व्हेरीयंटमध्ये लॉंच केली आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने यामध्ये ९९९ cc इंजिन दिले आहे, जे ५४ PS पॉवर आणि ७२ Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

(हे ही वाचा: KIA च्या नवीन कार ‘Carens’ MPV चे बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या फीचर्स)

या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आहे, जो Android Auto, Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह दिलेला आहे, याशिवाय कीलेस एंट्री, ABS, EBD, रियर पार्किंग सेन्सर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

मायलेजच्या बाबतीत, कंपनीने दावा केला आहे की डैटसन रेडी गो कार २२.० kmpl मायलेज देईल. डैटसन रेडी गो ची ची किंमत ३.८३ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंट ४.९५ लाख रुपयांपर्यंत जाईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2022 at 13:55 IST

संबंधित बातम्या