भारतात ‘या’ स्वस्त मोटारसायकलींना पसंती; ८० किमीपर्यंत मायलेज आणि किंमत ५१ हजारांपासून

भारतात कारच्या तुलनेत मोटारसायकलींना सर्वाधिक पसंती मिळते. त्यात स्वस्त आणि दिसण्यास आकर्षक असलेल्या मोटारसायकलींचा खप सर्वाधिक आहे.

CT_100
भारतात 'या' स्वस्त मोटारसायकलींना पसंती; ८० किमीपर्यंत मायलेज आणि किंमत ५१ हजारांपासून (Photo- Bajaj Website)

भारतात कारच्या तुलनेत मोटारसायकलींना सर्वाधिक पसंती मिळते. त्यात स्वस्त आणि दिसण्यास आकर्षक असलेल्या मोटारसायकलींचा खप सर्वाधिक आहे. तर मायलेज चांगला असल्यास डोळे बंद करून मोटारसायकल खरेदी केली जाते. सध्या भारतीय बाजारात ३ मोटारसायकलींचा बोलबाला आहे. आकर्षक लूक आणि मायलेजमुळे या मोटारसायकलींना पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर खिशाला परवडणारी मोटारसायकल असल्याने सर्वसामान्य खरेदी करत आहेत. मोटारसायकलींची किंमत ५१ हजार रुपयांपासून सुरु होते.

Hero HF 100

हीरो एचएफ १०० बाईकमध्ये ९७.२ सीसी इंजिन आहे, जे ८.३६ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबतच फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेकसह इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम, अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर आणि ओडोमीटर, मॅन्युअल ट्रान्समिशन, ४ स्पीड गिअरबॉक्स, एक्ससेन्स टेक्नॉलॉजी, हॅलोजन हेडलाइट आणि बल्ब टेल लाइट आणि टेल सिग्नल लॅम्प यांसारखे फिचर्स कंपनीने दिले आहेत.

मायलेज: ७० किलोमीटरपर्यंत प्रति लिटर
सुरुवातीची किंमत: ५०,९०० रुपये

Bajaj CT100

बजाजच्या Bajaj CT100 बाइकला १०२ सीसी इंजिन देण्यात आले आहे. जे ७.९ पीएस पॉवर आणि ८.३४ एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबतच फ्रंट ड्रम ब्रेक आणि रियर ड्रम ब्रेक विथ कॉम्बी ब्रेक सिस्टिम, अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर आणि ओडोमीटर, मॅन्युअल ट्रान्समिशन, ४ स्पीड गिअरबॉक्स, हॅलोजन हेडलाइट आणि बल्ब टेल लाइट आणि टेल सिग्नल लॅम्प यासारखे फिचर्स दिले आहेत.
मायलेज: ८९.५ किलोमीटरपर्यंत प्रति लिटर
सुरुवातीची किंमत: ५३,६९६ रुपये

TVS Sport

टीव्हीएस स्पोर्ट बाईकमध्ये १०९.७ सीसी इंजिन आहे. जे ८.२९ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबतच या बाईकमध्ये फ्रंट ड्रम ब्रेक आणि सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टीमसह रियर ड्रम ब्रेक, अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर आणि ओडोमीटर, मॅन्युअल ट्रान्समिशन, ४ स्पीड गिअरबॉक्स, एअर फिल्टर, गियर शिफ्ट पॅटर्न, इकोनोमीटर, हॅलोजन हेडलाइट आणि बल्ब आहेत.
मायलेज: ७६.४ किलोमीटरपर्यंत प्रति लिटर
सुरुवातीची किंमत: ५८,१३० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: These cheap motorcycle prefer in india rmt

Next Story
‘या’ आहेत कमी बजेटमध्ये ७६ Kmpl पर्यंत मायलेज देणाऱ्या वजनाने हलक्या स्टायलिश टॉप ३ स्कूटी!Top-3-Lightweight-Scooters
ताज्या बातम्या