five things should keep in your car in monsoon : सध्या पावसाळा सुरू आहे. अशात घराबाहेर पडताना खूप काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात तुम्ही कार चालवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे कारण इतर सर्व ऋतूंपेक्षा पावसाळ्यात कार चालवणे अवघड जाते. पावसाळ्यात रस्ते खराब असतात अशावेळा कार चालवताना काही गोष्टी तुमच्या जवळ असायला हव्यात कारण या वस्तुंची पावसाळ्यात तुम्हाला केव्हाही गरज पडू शकते. या गोष्टी कदाचित कधीही तुमच्या कामात पडू शकतात. चला तर त्या वस्तू कोणत्या, सविस्तर जाणून घेऊ या.

छत्री

पावसाळ्यात छत्री ही अत्यंत उपयोगाची वस्तू आहे. पावसाळ्यात बाहेर पडताना बॅगमध्ये जशी छत्री असायला हवी तशी तुमच्या कारमध्ये सुद्धा एक छत्री असायलाच हवी. जर कधी तु्म्हाला भर रस्त्यात अचानक कारच्या बाहेर पडावे लागले तेव्हा ही छत्री कामी पडू शकते. जर तुमच्याकडे छत्री नसेल तर तुम्ही पाण्यात भिजू शकता ज्यामुळे तुमच्या गाडीच्या सीट्स सुद्धा खराब होतील.

Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Maruti Suzuki Car
मायलेज २६ किमी, ‘या’ ७ सीटर कारच्या खरेदीसाठी मोठी गर्दी; तुफान मागणीमुळे ४३ हजार कारची डिलीव्हरी पेंडिंग, किंमत…
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Kitchen jugad video Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon kitchen tips
Kitchen Jugaad: पेपरवर कांदा ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच
Hyundai Exter SUV
किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री
Best Selling SUV
मारुतीची Wagon R नव्हे तर Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, ३० दिवसात १८ हजाराहून अधिक गाड्यांची विक्री
Dashcam for vehicle
वाहन आणि चालकांच्या सुरक्षेसाठी गाडीत बसवा HD क्वॉलिटीचा डॅशकॅम; काय आहे किंमत, जाणून घ्या…
Pune people are you planning to visit Tamhini Ghat this weekend Wait First watch this video
पुणेकरांनो, विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखताय? थांबा….आधी हा Video बघा

हेही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, आता Royal Enfield आणतेय इलेक्ट्रिक बुलेट, पाहा कधी होणार दाखल?

दोरी

पावसाळ्यात तुमच्या कारमध्ये एक मोठी जाड दोरी असणे, गरजेचे आहे कारण अनेकदा कार चिखलात किंवा पाण्यात अडकते. तेव्हा ही अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी जाड दोरी कामी पडू शकते. त्यामुळे एक लांब आणि जाड दोरी तुमच्या कारमध्ये ठेवा.

टॉर्च

पावसाळ्यात नेहमी टॉर्च लाइट गाडीमध्ये ठेवावा.पावसाळ्यात अनेकदा वीज ये जा करते अशा वेळी कारनी प्रवास करताना कधीही टॉर्च कामी पडू शकतो.

फोन चार्जर

फोन ही अत्यंत गरजेची वस्तू आहे अशात पावसाळ्यात गाडी चालवताना गाडीमध्ये फोन चार्जर नेहमी बरोबर ठेवावा. अनेकदा मुसळधार पावसामुळे आपण बाहेरच अडकतो. अशावेळी गाडीमध्ये फोन चार्जर असेल तुम्हाला फायदा होऊ शकतो. गरज पडली तर तुम्ही कॉल करून अडचणीच्या वेळी मदत मागू शकता.

हेही वाचा : मायलेज २६ किमी, ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसाठी ग्राहकांच्या रांगा; तुफान मागणीमुळे ४३ हजार कारची डिलीव्हरी पेंडिंग, किंमत…

मेडिकल किट

मेडिकल किट ही प्रत्येकाच्या घरात असणे गरजेचे आहे पण त्याचबरोबर तुमच्या गाडीमध्ये सुद्धा मेडिकल किट असावी. अनेकदा पावसाळ्यात लहान मोठे अपघात होण्याची जास्त शक्यता असते अशावेळी मेडिकल किट कधीही कामी पडू शकते आणि तुम्ही सर्वात आधी जखमेवर उपचार करू शकता.