scorecardresearch

Premium

Maruti Alto आणि Royal Enfield च्या पार्ट्सपासून बनवलीय ही विंटेज इलेक्ट्रिक कार; किंमत जाणून बसेल धक्का

आज आपण एका विंटेज दिसणाऱ्या इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊया जी मारुती सुझुकी अल्टो आणि रॉयल एनफील्ड बुलेटच्या काही भागांपासून बनवण्यात आली आहे.

This vintage electric car made from parts of Maruti Alto and Royal Enfield
ईव्हीची निवड करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. (Photo : greenmasters.world)

आता जगभरात इलेक्ट्रिक वाहने ट्रेंडमध्ये येत आहेत आणि भारतीय बाजारपेठेतही नवीन इलेक्ट्रिक वाहने सातत्याने बनवली आणि सादर केली जात आहेत. सर्वसामान्यांना त्यांचा वापर करता यावा यासाठी सरकारही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, त्यामुळेच ईव्हीची निवड करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, तुम्ही इलेक्ट्रिक किटच्या मदतीने तुमचे सध्याचे वाहन ईव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. आज आपण एका विंटेज दिसणाऱ्या इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊया जी मारुती सुझुकी अल्टो आणि रॉयल एनफील्ड बुलेटच्या काही भागांपासून बनवण्यात आली आहे.

ही इलेक्ट्रिक कार सिरसाच्या ग्रीन मास्टर नावाच्या कंपनीने तयार केली आहे. भारतातील ग्राहक कोठूनही ही ईव्ही खरेदी करू शकतात. या कारचे सर्व पार्ट्स सहजासहजी मिळत नाहीत, त्यामुळे कार आणि बाईकचे पार्ट्स मिसळून ही कार तयार करण्यात आली आहे. कारच्या पुढील आणि मागील बाजूस लावलेल्या दिव्यांशिवाय या कारचे टायरही बुलेटमधून घेण्यात आले आहेत.

Google Pixel 7 Discount
Google च्या ‘या’ नव्याकोऱ्या स्मार्टफोनचे १५ हजारात व्हा मालक; ‘इथे’ मिळतोय डिस्काउंट…
Honor 90 to be available discounted price on amazon great indian festival sale
Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच
moto edge40 neo launch in india
५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला MoTo चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, किंमत आणि ऑफर्स एकदा पाहाच
Maruti Dzire
कित्येक गाड्या आल्या तरी ‘या’ सेडानचा जलवा कायम, अमेझ, ऑरा, टिगॉरला धोबीपछाड, ठरली बेस्ट सेलिंग कार

बार, पब आणि क्लबमधील नेमका फरक तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या त्यांच्यातील वेगळेपण

चाव्या आणि पायलट दिवे देखील येथून घेण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक कार दिसायला खूपच सुंदर आहे आणि तिच्या पुढच्या भागात लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. १९-इंच चाके आणि चाकांच्या कमानी या कारला संपूर्ण विंटेज लुक देतात.

कारच्या मागील भागात एक ट्रंक बसवण्यात आली आहे ज्यामध्ये सामान ठेवण्यासाठी ७० लिटर जागा उपलब्ध आहे. कंपनीने इलेक्ट्रिक कार केवळ दिसायलाच सुंदर बनवली नाही, तर तिला योग्य रेंजही दिली आहे. कारमध्ये १२०० वॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे जी १.५ हॉर्सपॉवर आणि २.२ इनएम पीक टॉर्क जनरेट करते. पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी १०० किमी पर्यंतची रेंज देते. कारसोबत चारही अलॉय व्हील देण्यात आले असून मागील बाजूस एक स्पेअर टायरही देण्यात आला आहे. या कारची सुरुवातीची किंमत २.४५ लाख रुपये आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This vintage electric car made from parts of maruti alto and royal enfield pvp

First published on: 08-05-2022 at 13:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×