scorecardresearch

मजबूत इंजिन, स्टाइलसह ५० किमीपर्यंतचा मायलेज देणाऱ्या तीन क्रुझर बाइकबद्दल जाणून घ्या

देशातील तरुणांकडून क्रूझर आणि स्पोर्ट्स बाईक सेगमेंटला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.

Bajaj-Avenger-Street-160
मजबूत इंजिन, स्टाइलसह ५० किमीपर्यंतचा मायलेज देणाऱ्या तीन क्रुझर बाइकबद्दल जाणून घ्या (फोटो- BAJAJ)

देशातील तरुणांकडून क्रूझर आणि स्पोर्ट्स बाईक सेगमेंटला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर जवळपास प्रत्येक वाहन निर्मात्या कंपनीने या सेगमेंटमध्ये त्यांच्या बाइक्स लॉन्च केल्या आहेत. आज आम्ही चांगला मायलेज आणि कमी बजेटवाल्या क्रूझर बाइक्सबद्दल सांगणार आहोत. तुम्हालाही मायलेज देणारी क्रूझर बाइक घ्यायची असेल, तर देशातील टॉप ३ क्रूझर बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Bajaj Avenger Street 160: बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 ही या सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश आणि हलक्या वजनाची क्रूझर बाईक आहे. कंपनीने बाजारात फक्त एकाच प्रकारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, यात १६० सीसी इंजिन आहे. एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १५ पीएस पॉवर आणि १३.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ५०.७७ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. Bajaj Avenger Street 160 ची सुरुवातीची किंमत १.०८ लाख रुपये आहे.

Royal Enfield Bullet 350: रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० कंपनीची एक लोकप्रिय बाईक आहे. कंपनीने दोन व्हेरियंटसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात ३४६ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे एअर-कूल्ड इंधनावर आधारित आहे. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससह १९.३६ पीएस पॉवर आणि २८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ४०.८ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. आहे. Royal Enfield Bullet 350 ची सुरुवातीची किंमत १.३८ लाख रुपये आहे. टॉप मॉडेलमध्ये १.६० लाख रुपयांपर्यंत जाते.

Hero Splendor Plus vs TVS Radeon: कमी बजेटमध्ये कोणती बाईक ८० किमीचा मायलेज देते, जाणून घ्या

Honda Hness CB350: ही बाईक कंपनीची प्रीमियम क्रूझर बाईक आहे. कंपनीने तीन प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले त,र यात ३४८.३६ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २१.०७ पीएसची पॉवर आणि ३० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने या बाईकच्या मायलेजबद्दल दावा केला आहे की ४५.८ किमीचा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three cruiser bikes with strong engine style and mileage up to 50 km rmt

ताज्या बातम्या