दैनंदिन आयुष्यात जगताना कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्यासाठी स्वत:च्या मालकी हक्काची एक कार असावी, असं प्रत्येकाला वाटतं. पण फॅमिली कारच्याही पलीकडे रस्त्यावर धावणाऱ्या स्पोर्ट्स कार लोकांना अधिक आकर्षित करत आहेत. कारण येत्या काही वर्षात स्पोर्ट्स कारचे चाहते असणाऱ्यांसाठी तीन लेटेस्ट Sub-Compact SUVs लॉंच होणार आहेत. एव्हढच नाही, तर फोक्सवॅगन आणि होंडा कंपनीकडूनही २०२४-२५ मध्ये sub-4 मीटर SUV सेगमेंट विविध मॉडेल्सच्या माध्यमातून लॉंच करण्याचा प्लान आखला जात आहे. दरम्यान, वेगवेगळ्या कॉम्पॅक्ट SUV EVs ची विक्री आगामी काळात लवकरच सुरु करणार असल्याची माहिती आहे. २०२३ च्या फर्स्ट हाफमध्ये टॉप तीन SUVs भारतात लॉंच होणार आहेत. जाणून घ्या या कार्सबाबत सविस्तर माहिती.

Maruti Jimmy (मारुती जिम्मी)

Maruti jimmy suv car launch soon
मारुतीची जिम्मी एसयुव्ही कार लवकरच लॉंच होणार आहे.
Maruti jimmy suv car

मारुती कंपनीची जीमी लाइफस्टाइल SUV भारतात २०२३ मध्ये लॉंच केली जाणार आहे. कंपनीकडून मिनी ऑफ रोडरच्या 5-डोअर व्हर्जन विषयी माहिती देण्यात येणार आहे. भारतातील रस्त्यांवर अशा कार्स अनेकदा धावताना दिसल्या आहेत. तसंच जागतिक पातळीवर ही कार Auto Expo 2023 मध्ये लॉंच केली जाईल. नवीन 5 डोअर जिम्मी महिंद्रा थार, फोर्स गुरखा आणि या कॅटेगरीतील अन्य कार्सच्या बरोबरीत टक्कर देईल. जिम्मी सीएरा बेस्ड नवीन 5 डोअर जिम्मीची लांबी 3850 mm असणार आहे. तर रुंदी 1645 mm आणि उंची 1730 mm असणार आहे. तसंच 2550 mm चे व्हिलबेसही या कारचं वैशिष्ट्य असणार आहे. हे व्हिलबेस 300 mm ने वाढवण्यात आल्याने एकूण लांबी 300 mm ने वाढणार आहे. या नवीन जिम्मी कारमध्ये 1.5-लिटर K15c पेट्रोल इंजिन माईल्ड हायब्रिड सेट अपने बसवलेला आहे. 101 bhp आणि 137 Nm टॉर्क्यू निर्मिती करण्याची क्षमता या इंजिनमध्ये आहे. तसंच ट्रान्समिशन मध्ये 5-स्पीड मॅन्यूअल आणि 6-स्पीड टॉर्क्यू ऑटोमॅटिक कन्वर्टरचा समावेश आहे. तसंच यामध्ये मारुतीच्या AllGrip pro AWD चा सेटअपही बसवण्यात येणार आहे.

Whatsapp New Feature Search Messages by Date Marathi News
WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?

Maruti YTB/Toyota SUV Coupe

मारूती सुझूकी नवीन क्रॉसओव्हरची निर्मिती करत आहे. YTB या नावाने भारतीय बाजारात ही कार लॉंच करण्यात येणार आहे.
Maruti YTB

मारूती सुझूकी नवीन क्रॉसओव्हरची निर्मिती करत आहे. YTB या नावाने भारतीय बाजारात ही कार लॉंच करण्यात येणार आहे. ही नवीन मॉडेलची कार सुझूकीच्या प्लॅटफॉर्मच्या नवीन बलेनोवर आधारित असणार आहे. ही नवीन क्रॉसओव्हर NEXA प्रिमिअम डिलरशिप नेटवर्कच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. Auto Expo 2023 मध्ये जानेवारी महिन्यात या कारचं अनावरण करण्यात येईल. तर नवीन बलेनो क्रॉस फेब्रुवारी महिन्यात लॉंच केली जाणार आहे. ही कार Nisaan Magnite, Renault Kiger,hyundai venue च्या बरोबरीसाठी टक्कर देईल. नवीन 1.0 लिटर बुस्टरजेट पेट्रोल इंजिन, 100 bhp आणि 150 Nm टॉर्क्यू, असे या कारचं वैशिष्ट्य असणार आहे. इंजिनमध्ये इंटिग्रेडट स्टार्टर जनरेटर आणि 48v माईल्ड हायब्रिड SHVS सिस्टम असणार आहे.

Hyundai Micro SUV

Hyundai कंपनी नवीन मायक्रो SUV 2023 मध्यंतरी सण उत्सवांच्या आधी भारतात लॉंच करणार आहे.
Hyundai Micro SUV

Hyundai कंपनी नवीन मायक्रो SUV 2023 मध्यंतरी सण उत्सवांच्या आधी भारतात लॉंच करणार आहे. Ai3 CUV असं या कारचं कोडनेम असणार आहे. हा नवीन मॉडेल Grand i10 Nios या कारप्रमाणे असणार आहे. 2023 Auto Expo मध्ये या कारचं अनावरण करण्यात येणार आहे. टाटा पंच, निसान मॅग्नाईट आणि रिनॉल्ट किगरच्या बरोबरीत ही कार असणार आहे. तसंच नवीन Hyundai SUV कारचे इंजिन 82bhp आणि 114 Nm टॉर्क्यू असणार आहे. ट्रान्समिशन्समध्ये 5-स्पीड मॅन्यूअल आणि AMT असणार आहे. तसेच सबकॉम्पॅक्ट SUV ला सीएनजीचा विकल्पही मिळण्याची शक्यता आहे.