दैनंदिन आयुष्यात जगताना कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्यासाठी स्वत:च्या मालकी हक्काची एक कार असावी, असं प्रत्येकाला वाटतं. पण फॅमिली कारच्याही पलीकडे रस्त्यावर धावणाऱ्या स्पोर्ट्स कार लोकांना अधिक आकर्षित करत आहेत. कारण येत्या काही वर्षात स्पोर्ट्स कारचे चाहते असणाऱ्यांसाठी तीन लेटेस्ट Sub-Compact SUVs लॉंच होणार आहेत. एव्हढच नाही, तर फोक्सवॅगन आणि होंडा कंपनीकडूनही २०२४-२५ मध्ये sub-4 मीटर SUV सेगमेंट विविध मॉडेल्सच्या माध्यमातून लॉंच करण्याचा प्लान आखला जात आहे. दरम्यान, वेगवेगळ्या कॉम्पॅक्ट SUV EVs ची विक्री आगामी काळात लवकरच सुरु करणार असल्याची माहिती आहे. २०२३ च्या फर्स्ट हाफमध्ये टॉप तीन SUVs भारतात लॉंच होणार आहेत. जाणून घ्या या कार्सबाबत सविस्तर माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maruti Jimmy (मारुती जिम्मी)

Maruti jimmy suv car

मारुती कंपनीची जीमी लाइफस्टाइल SUV भारतात २०२३ मध्ये लॉंच केली जाणार आहे. कंपनीकडून मिनी ऑफ रोडरच्या 5-डोअर व्हर्जन विषयी माहिती देण्यात येणार आहे. भारतातील रस्त्यांवर अशा कार्स अनेकदा धावताना दिसल्या आहेत. तसंच जागतिक पातळीवर ही कार Auto Expo 2023 मध्ये लॉंच केली जाईल. नवीन 5 डोअर जिम्मी महिंद्रा थार, फोर्स गुरखा आणि या कॅटेगरीतील अन्य कार्सच्या बरोबरीत टक्कर देईल. जिम्मी सीएरा बेस्ड नवीन 5 डोअर जिम्मीची लांबी 3850 mm असणार आहे. तर रुंदी 1645 mm आणि उंची 1730 mm असणार आहे. तसंच 2550 mm चे व्हिलबेसही या कारचं वैशिष्ट्य असणार आहे. हे व्हिलबेस 300 mm ने वाढवण्यात आल्याने एकूण लांबी 300 mm ने वाढणार आहे. या नवीन जिम्मी कारमध्ये 1.5-लिटर K15c पेट्रोल इंजिन माईल्ड हायब्रिड सेट अपने बसवलेला आहे. 101 bhp आणि 137 Nm टॉर्क्यू निर्मिती करण्याची क्षमता या इंजिनमध्ये आहे. तसंच ट्रान्समिशन मध्ये 5-स्पीड मॅन्यूअल आणि 6-स्पीड टॉर्क्यू ऑटोमॅटिक कन्वर्टरचा समावेश आहे. तसंच यामध्ये मारुतीच्या AllGrip pro AWD चा सेटअपही बसवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three suv car launch in india soon auto expo 3 latest sub compact suvs launhing in upcoming year nss
First published on: 26-11-2022 at 18:38 IST