Car Sales in Feb 2023: भारतीय कार बाजारात अजूनही परवडणाऱ्या हॅचबॅक कारची मागणी आहे. दर महिन्याला सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप पाच कारमधील बहुतांश मॉडेल्स फक्त हॅचबॅक कार आहेत. मारुती सुझुकी अल्टो आणि स्विफ्ट ही दोन अशी नावे आहेत ज्यांना ग्राहकांकडून खूप प्रेम मिळत आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात मारुतीच्या एका कारने अल्टो, स्विफ्ट आणि वॅगनआर सारख्या गाड्यांना मागे टाकत बेस्ट सेलिंग कार्सचा किताब पटकावला आहे. या कारची किंमत फक्त ६.५ लाख रुपये आहे.

Maruti Baleno

मारुती सुझुकी बलेनो ही फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या महिन्यात १८,५९२ युनिट्सची विक्री झाली, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १२,५७० युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच वार्षिक आधारावर त्याची विक्री ४७.९१ टक्क्यांनी वाढली आहे. मारुती बलेनोची किंमत ६.५६ लाख ते ९.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Toyota Innova Hycross GX(O) launch
XUV700, Scorpio सर्व विसरुन जाल! देशात आली ७ रंगांत ८ सीटर कार, मोठ्या कुटुंबियांसाठी आहे बेस्ट
Hyundai Creta facelift
६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत

Maruti Swift

मारुती स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये १८,४१२ युनिट्सची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १९,२०२ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, त्याच्या विक्रीत ४.११ टक्क्यांची (वार्षिक) घट नोंदवली गेली आहे.

(हे ही वाचा : Maruti, Mahindra, Tata चे धाबे दणाणले, येतेय् केवळ ७ मिनिटात ८० टक्के चार्ज होणारी सात सीटर इलेक्ट्रिक कार )

फेब्रुवारीमध्ये कोणत्या कार सर्वाधिक विकल्या गेल्या, पहा यादी

१. Maruti Baleno – १८,५९२

२. Maruti Swift – १८,४१२

३. Maruti Alto – १८,११४

४. Maruti WagonR – १६,८८९

५. Maruti Dzire – १६,७९८

६. Maruti Brezza – १५,७८७

७. Tata Nexon – १३,९१४

८. Maruti Suzuki Eeco – ११, ३५२

९. Tata Punch – ११,१६९

१०. Hyundai Creta – १०,४२१