कार सेक्टरमध्ये पेट्रोल कारसोबतच आता सीएनजी किट कारची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. लोकांची ही मागणी लक्षात घेऊन ऑटोमेकर्स एकतर त्यांच्या सध्याच्या कारचे CNG व्हेरिएंट लॉन्च करत आहेत. तसंच नवीन CNG कार बनवत आहेत.
तुम्ही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण किंमत आणि मायलेज बाबत तुम्हाला योग्य पर्याय सापडला नसेल, तर फॅक्टरी फिटेड सीएनजी किट असलेल्या टॉप ३ कारचे संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या.
Maruti S-Presso CNG: मारुती एस्प्रेसो ही एक मायक्रो एसयूव्ही आहे जी त्याच्या विभागातील आणि कंपनीतील सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. कंपनीने आपले चार ट्रिम्स बाजारात आणले आहेत.
या SUV मध्ये 998 cc चे 1 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 68 PS पॉवर आणि 90 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
मारुती एस्प्रेसोच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही एसयूव्ही ३१.२ किमी प्रति किलो मायलेज देते आणि हे मायलेज एआरएआयने प्रमाणित केले आहे. मारुती एस्प्रेसो सीएनजीची किंमत ५,३८,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड ५,८८,५३१ रुपयांपर्यंत जाते.
आणखी वाचा : Maruti WagonR विकत घेण्यासाठी ५ नव्हे फक्त २ लाख खर्च, जाणून घ्या ऑफर
Maruti WagonR CNG: मारुती वॅगनआर ही त्याच्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणली जाते, जी तिच्या मायलेज, केबिन स्पेस, बूट स्पेससाठी पसंत केली जाते.
मारुती वॅगनआरमध्ये ११९७ सीसीचे १ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६७ पीएस पॉवर आणि ८९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार ३४.०५ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. मारुती वॅगनआर सीएनजीची सुरुवातीची किंमत ६,४२,५०० रुपयांपासून सुरू होते जी ऑन रोड ७,१७,०४८ रुपयांपर्यंत जाते.
Maruti Celerio CNG: कंपनीने नुकतेच मारुती सेलेरियो अपडेट केले आहे आणि नवीन फीचर्स, इंजिन्स आणि स्पेसिफिकेशन्ससह मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीने आपले चार ट्रिम्स बाजारात आणले आहेत.
मारुती सेलेरियोमध्ये ९९८ cc चे १ लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ६७ पीएस पॉवर आणि ८९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.
कारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार ३५.६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. मारुती सेलेरियो सीएनजीची सुरुवातीची किंमत ६,६९,००० रुपयांपासून सुरू होते जी ऑन रोड ७,४९,६४३ रुपयांपर्यंत जाते.