भारतातील कार क्षेत्रातील इलेक्ट्रिक कारची मागणी अलीकडच्या वर्षांत लक्षणीय वाढली आहे, ज्यामुळे कार उत्पादकांनी पेट्रोल आणि डिझेल कारसह इलेक्ट्रिक कार बनवण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हालाही इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल, परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या कारपैकी कोणतीही निवड करू शकत नसाल, तर देशात जून २०२२ मध्ये सर्वाधिक पसंत केलेल्या आणि खरेदी केलेल्या टॉप ३ इलेक्ट्रिक कारचे तपशील येथे जाणून घ्या.

Tata Nexon EV and Tata Tigor EV
Tata Nexon EV आणि Tata Tigor EV जून २०२२ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. टाटा मोटर्सने जूनमध्ये Tata Nexon EV आणि Tata Tigor EV च्या ३,०८९ युनिट्सची विक्री केली आहे.

टाटा मोटर्सच्या या दोन्ही कार इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत, ज्यामध्ये टाटा नेक्सॉन आणि टिगोर यांचा या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ८७.७० टक्के वाटा आहे. Tata Motors च्या या दोन्ही इलेक्ट्रिक कार्सनी यावर्षी विक्रीच्या बाबतीत ३६५.५६ टक्क्यांनी मोठी वाढ केली आहे.

आणखी वाचा : Cheapest Electric Car India: २०० किमीची रेंज देणारी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, ५ लाखांपेक्षा कमी किंमत

MG ZS EV
MG ZS EV देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कंपनीने जून २०२२ मध्ये या इलेक्ट्रिक SUV च्या २३२ युनिट्सची विक्री केली आहे, तर कंपनी गेल्या वर्षी म्हणजे जून २०२१ मध्ये या इलेक्ट्रिक कारचे फक्त १६० युनिट्स विकू शकली.

या एका वर्षात, या MG ZS EV ने ४५ टक्के वाढ केली आहे. परंतु इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक SUV चा वाटा फक्त ७.५१ टक्के आहे.

आणखी वाचा : बजेट कमी आहे पण हॅचबॅक कार घ्यायचीय? मग अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा Renault Kwid, वाचा ऑफर

Hyundai Kona EV
Hyundai Motors ची इलेक्ट्रिक SUV Hyundai Kona ने देशातील सर्वाधिक पसंतीच्या इलेक्ट्रिक कारच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
Hyundai Motors ने जून २०२२ मध्ये या इलेक्ट्रिक SUV च्या ५२ युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी म्हणजेच जून २०२१ मध्ये कंपनी या SUV चे फक्त १२ युनिट्स विकू शकली.

Hyundai Kona ने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये विक्रीत वाढ केली आहे, परंतु सध्या एकूण बाजारात या इलेक्ट्रिक SUV चा वाटा फक्त १.६८ टक्के आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 3 best selling electric cars in india tata nexon ev tigor ev mg zs ev hyundai kona read complete details prp
First published on: 28-07-2022 at 17:25 IST