कार सेक्टरच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कारची मोठी रेंज आहे आणि ज्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार पसंत केल्या जातात तो हॅचबॅक सेगमेंट आहे. कमी बजेटपासून ते मोठ्या रेंजपर्यंतच्या कार या सेगमेंटमध्ये सहज उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल, परंतु कमी बजेटमुळे खरेदी करता येत नसेल, तर आम्ही तुम्हाला या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त टॉप ३ कारची संपूर्ण माहिती सांगणार आहोत ज्या तुमच्या बजेटमध्ये आरामात बसू शकतात.
Maruti Alto: मारुती अल्टोमध्ये कंपनीने ७९६ cc ०.८ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ४८ PS पॉवर आणि ६९ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

कारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार २२.०५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. मारुती अल्टो ८०० चे बेस मॉडेल ३,३९,००० रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम, दिल्ली) जे ३,७६,७८७ रुपयांपर्यंत जाते.

आणखी वाचा : Royal Enfield Classic 350 खरेदी करण्यासाठी २ लाख नव्हे फक्त ६० हजार रुपये खर्च, काय आहे ऑफर?

Datsun Redi Go: ही मारुती अल्टो नंतरची दुसरी सर्वात कमी किंमत असलेली कार आहे ज्यामध्ये कंपनीने ९९९ cc ०.८ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ५४ PS पॉवर आणि ७२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही Datsun redi GO २२.० kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Datsun redi GO चे बेस मॉडेल रु.३,८३,८०० (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड रु. ४,२०,५०० पर्यंत जाते.

आणखी वाचा : कुटुंब मोठे असेल तर कमी बजेटमध्ये ही ७ सीटर कार ठरेल बेस्ट ऑप्शन, किंमत ५ लाखांपेक्षा कमी

Maruti S-Presso: मारुती एस-प्रेसो ही त्यांच्या कंपनीची तसेच या देशातील सर्वात कमी किमतीची मायक्रो एसयूव्ही आहे. या SUV मध्ये कंपनीने ९९८  cc चे १ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ६८ PS पॉवर आणि ९० Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.


मायलेजबद्दल, मारुती सुझुकीचा दावा आहे की ही कार २१.४  kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Maruti S Presso च्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत ३,९९,५०० रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली) जी ऑन रोड असताना ४,४१,५२३ रुपयांपर्यंत जाते.