कार क्षेत्रातील एमपीव्ही सेगमेंटला नेहमीच मागणी असते. या सेगमेंटमध्ये येणाऱ्या गाड्या घरगुती वापरासाठी तसेच व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जातात. तुमचे कुटुंब मोठे असल्यास एमपीव्ही गाडी सोयीस्कर ठरते. कोणताही व्यवसायासाठी ७ सीटर कार फायदेशीर ठरते. जर तुम्ही एमपीव्ही कार खरेदी करू इच्छित असल्यास मार्च २०२२ मध्ये देशातील टॉप ३ सर्वाधिक विक्री होणाऱ्या एमपीव्हीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या. मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या एमपीव्हीच्या किमतीपासून ते वैशिष्ट्ये आणि मायलेजपर्यंतचे संपूर्ण माहिती मिळेल. जेणेकरून तुम्ही तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडू शकाल.

Toyota Innova Crysta: टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही या विभागातील एक लोकप्रिय एमपीव्ही आहे. मार्च महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी एमपीव्ही बनली आहे. कंपनीने मार्च महिन्यात या टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या ७,९१७ युनिट्सची विक्री केली आहे, तर फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीने या एमपीव्हीच्या फक्त ४,३१८ युनिट्सची विक्री करू शकली होती. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची सुरुवातीची किंमत रु. १७.८६ लाख रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना रु. २५.६८ लाखांपर्यंत जाते.

Maruti Ertiga: मारुती एर्टिगा ही त्यांच्या कंपनीसह या विभागातील एक लोकप्रिय एमपीव्ही आहे. मार्च महिन्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही बनली आहे. मारुती सुझुकीने मार्च २०२२ मध्ये या मारुती एर्टिगाच्या ७,८८८ युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने फेब्रुवारी २०२२ मध्ये ११,६४९ युनिट्स विकल्या आणि मार्चमध्ये त्याची विक्री कमी झाली आहे. असं असलं तरी एमपीव्ही नंबर दोनचे स्थान पटकावण्यात यशस्वी ठरली आहे. या गाडीची किंमत ८.३५ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटमध्ये १२.७९ लाख रुपयांपर्यंत जाते.

Tata Motors लाँच करणार चार इलेक्ट्रिक कार; चांगल्या मायलेजसह मिळणार हायटेक फिचर्स, जाणून घ्या

Kia Carens: आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह किआ कॅरेन्स ही या विभागाची नवीन एमपीव्ही आहे. अल्पावधीतच प्रचंड यशस्वी झाली आहे. किआ मोटर्सने मार्च २०२२ मध्ये या एमपीव्हीच्या ७,००८ युनिट्सची विक्री केली आहे. ही एमपीव्ही सेगमेंटमध्ये तिसरी सर्वात जास्त आवडलेली एमपीव्ही बनली आहे. किआ कॅरेन्सची सुरुवातीची किंमत ९.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना १७.६९ लाख रुपयांपर्यंत जाते.