scorecardresearch

४ लाखांच्या ‘या’ कारने Baleno अन् Swift ला फोडला घाम, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा

Best Selling Cars: देशात नंबर १ बनण्याच्या शर्यतीत ‘या’ कारची बाजी…

Maruti Car Sales
'ही' कार ठरली नंबर वन (Photo-financialexpress)

Maruti Car Sales: फेब्रुवारी २०२३ मध्येही मारुती सुझुकी देशातील नंबर वन कार कंपनी ठरली आहे. गेल्या महिन्यात देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप सहा कार फक्त मारुती सुझुकीच्या होत्या. जर तुम्ही टॉप ५ ची यादी पाहिली तर, येथे सर्वात जास्त वार्षिक वाढ नोंदवणारी कार मारुती सुझुकी अल्टो आहे. अल्टो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असू शकते, परंतु तिची वार्षिक वाढ बलेनो आणि स्विफ्टपेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर टॉप ३ कारच्या विक्रीच्या आकड्यांमध्येही थोडा फरक आहे. पाहा खालील यादी…

मारुतीच्या ‘या’ कारनी मारली बाजी

१. फेब्रुवारी २०२३ मध्ये, मारुती सुझुकी बलेनो ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. कारने १८,५९२ युनिट्सची विक्री केली आहे, तर बलेनोची गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये १२,५७० युनिट्सची विक्री झाली आहे. अशा प्रकारे, बलेनोने ४८ टक्के वाढ नोंदवली आहे.

२. मारुती सुझकी स्विफ्ट नंबर दोनवर होती, हिने फेब्रुवारी २०२३ मध्ये १८,४१२ युनिट्सची विक्री केली. तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्विफ्टच्या १९,२०२ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच स्विफ्टच्या विक्रीत वार्षिक ४ टक्क्यांची घसरण झाली.

(हे ही वाचा: ‘या’ कारसमोर Maruti Ertiga ठरली फिकी, देशातली सर्वात स्वस्त कार नव्या अवतारात दाखल!)

३. मारुती सुझुकी अल्टो तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात या कारच्या १८,११४ युनिट्सची विक्री झाली होती, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अल्टोने ११,५५१ युनिट्सची विक्री केली होती. अशा प्रकारे अल्टोने ५७ टक्के वाढ नोंदवली आहे. मारुती अल्टो दोन मॉडेल्समध्ये येते, अल्टो 800 आणि अल्टो K10 तुम्हाला हे दोन्ही मॉडेल्स ४ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या श्रेणीत मिळतील.

कंपनीने गेल्या वर्षीच Alto K10 नवीन अवतारात लाँच केला होता आणि तेव्हापासून त्याच्या विक्रीत तेजी आली आहे. विशेष बाब म्हणजे, कंपनी अल्टोच्या दोन्ही मॉडेल्समध्ये सीएनजी सुविधा देखील देते, ज्यामुळे तुम्हाला ३१-३२ किमी. प्रति किलो मायलेज देईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 17:37 IST
ताज्या बातम्या