भारतीय टू-व्हीलर बाईक टॉर्क मोटर्स या महिन्याच्या अखेरीस त्यांची इलेक्ट्रिक बाईक लॉंच करणार आहे. या महिन्यात २६ जानेवारीला ही बाईक लॉंच करण्यात येणार आहे. कंपनीने असेही जाहीर केले आहे की नवीन मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाईक क्रॅटोस या नावाने येईल आणि तिच्या T6X संकल्पनेत बरेच बदल देखील केले जातील, जे एक आरामदायक राइड असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉर्क मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या बाईकच्या लॉंचसह डिलिव्हरीही सुरू होईल. या बाईकमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ही बाईक कंपनीने विकसित केलेल्या LIION बॅटरी पॅकसह ऑफर केली जाईल. अधिक रेंज देणारी ही बाईक असू शकते. याशिवाय, क्रॅटोस इलेक्ट्रिक मोटरसायकल फास्ट चार्जिंग, डेटा सेवा आणि ४जी टेलिमेट्री सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात येणार आहे. या बाईकच्या लुकबद्दल सांगायचे झाले तर तीक्ष्ण टँक एक्‍सटेन्‍शन आणि पॉइंट बॉडीसह स्पोर्टी दिसते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tork motors electric bike kartos is launching on 26th january compare with revolt rv400 know the price scsm
First published on: 18-01-2022 at 13:39 IST