scorecardresearch

Toyota Hilux SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार EMI मध्ये घसघशीत सूट; ‘या’ स्कीममधून ७० टक्के कॅशबॅकची हमी

या स्कीमअंतर्गत ग्राहकांना नवीन टोयोटा हिलक्स ३२,८८६ रुपये ईएमआयवर खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

toyota announces assured buyback scheme for the Hilux
Toyota Hilux SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना EMI मध्ये घसघशीत सूट; तर या स्कीममधून ७० टक्के कॅशबॅकची हमी photo: (toyotobharat.com)

Toyota Announces Assured Buyback Scheme for the Hilux: टोयोटा हिलक्स कार खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कंपनीने या एसयुव्ही कारसाठी अ‍ॅश्युयर्ड बायबॅक स्कीम जाहीर केली आहे. या स्कीमनुसार, ग्राहकांना हिलक्स खरेदी करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. ही सुविधा केवळ टोयोटा फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टोयोटा कंपनीच्या कस्टमर फर्स्ट फिलोसोफीनुसार, टोयोटा हिलक्स खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांना या स्कीमनुसार, कमी किमतीत हा कार खरेदी करता येईल, यामुळे पडणारा आर्थिक बोझा कमी होईल.

कमी EMI मध्ये हिलक्स खरेदीची संधी

अ‍ॅश्युयर्ड बायबॅक स्कीमच्या पहिल्या पर्यायांतर्गत, ग्राहक ३२,८८६ रुपयांचा EMI भरून नवीन टोयोटा हिलक्स एसयुव्ही कार खरेदी करु शकतील. तर दुसऱ्या पर्यायात हिलक्स खरेदी केल्याच्या तारखेपासून ३ वर्षांनंतर कंपनी ग्राहकांना वाहनाच्या किंमतीची ७० टक्के रक्कम परत करेल. पण ग्राहकांना अ‍ॅश्युयर्ड बायबॅक स्कीमच्या अटींनुसार, कंपनीला टोयोटा हिलक्स कार परत करावी लागेल.

या स्कीमची घोषणा करताना टोयोटो किर्लोस्कर मोटरच्या सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग वाइस प्रेसिडेंट अतुल सूद यांनी म्हटले की, हिलक्स बुकिंग पुन्हा सुरु करण्याच्या अलीकडील घोषणेसह आम्ही ग्राहकांच्या मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाने आम्ही पुन्हा एकदा भारावून गेलो आहोत. कमी ईएमआयमध्ये बेस्ट फाइनेंस ऑप्शनसह जागतिक स्तरावर पसंदास पडलेली हिलक्स एसयुव्हीचे मालक होणे सोपे होईल. याशिवाय अ‍ॅश्युअर्ड बायबॅक स्कीमचा दुसरा पर्याय, खरेदीच्या तारखेपासून 3 वर्षांनी हिलक्सच्या किमतीची ७० टक्के रक्कम परत मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना त्याची मालकी घेणे सोपे झाले आहे.

व्हाइस प्रेसिडेंट अतूल सूद यांनी म्हटले की, कंपनीला विश्वास आहे की, हिलक्स त्याच्या अतुलनीय बळकटपणा आणि पॉवरफुल परफॉर्मंससह एक नवीन बेंचमार्क सेट करत राहील. बिजनेस ट्रिप असो वा फॉमिली ट्रिप, हिलक्स ग्राहकांना फुलर लाइफसाठी जगण्याचा नवा अनुभव देत आहे. Isuzu V-Cross नंतर खाजगी खरेदीदारांसाठी Toyota Hilux ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेली एकमेव लाइफस्टाइल पिकअप आहे. फॉर्च्युनरप्रमाणेच ही दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या हिलक्समध्ये २.८ लिटर ४ सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन 201bhp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. या इंजिनसह मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 15:43 IST

संबंधित बातम्या