scorecardresearch

Premium

आनंद महिंद्राची ‘ही’ कार निघाली सर्वांची बाॅस, अनेक मोठ्या गाड्या झाल्या फेल, पुराच्या पाण्यातून…

आनंद महिंद्राच्या या कारपुढं सर्व पडल्या फेल…

Toyota Fortuner and Mahindra Scorpio N get stuck in flooded road
पाण्यातून थार गाडी अगदी आरामात निघाली बाहेर (Photo-financial express)

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात रस्ते वाहून गेले आहेत, बुडाले आहेत किंवा पावसाच्या पाण्याने तुंबले आहेत. यामुळे अनेक रस्ता वापरकर्त्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. नुकताच सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये Toyota Fortuner, Mahindra Scorpio N  आणि Mahindra Thar  यांनी पाणी भरलेल्या रस्त्यावर कसे प्रदर्शन केले ते दाखवले आहे.

प्रतिक सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या एका सदस्याने त्याच्यासोबत शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा रस्ता हा उत्तर प्रदेशातील नोएडाचा आहे. नोएडाचा समावेश असलेल्या दिल्ली एनसीआर भागात अलीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. म्हणजे अनेक रस्ते पाण्याने भरले आहेत. येथे पाणी साचल्याने या रस्त्याच्या खालच्या भागाचेच तलावात रुपांतर झाल्याचे दिसून येत आहे.  या व्हिडिओमध्ये पाण्यातून रस्ता ओलंडतांना मोठमोठ्या गाड्यांची कशी फजिती झाली हे दाखवण्यात आले आहे.

speeding vehicles killed leopard on samruddhi highway on the eve of wildlife week
समृद्धीने घेतला बिबट्याचा बळी, वन्यजीव सप्ताहाच्या पूर्वसंध्येला घडली घटना
Cell phone theft in immersion procession
विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा उच्छाद…पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर ‘एवढ्या’ नागरिकांनी केल्या तक्रारी
flood nagpur
नागपूरमधील पूरग्रस्त वस्त्यांचे चित्र; सामान रस्त्यावर, ‘टीव्ही’, ‘लॅपटॉप’ पाण्यामुळे खराब
cannabis gram Juna Andura
अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच…

(हे ही वाचा : मारुतीचा मोठा गेम! Hyundai च्या नव्या Micro SUV ची सुट्टी करण्यासाठी आणली CNG कार, मायलेज २८ किमी )

मारुती डिझायर सेडान पाण्यात वाहून जाताना दिसते. सेडानचा मागील भाग पाण्यावर तरंगू लागला आणि ड्रायव्हरला चालवता आलं नाही. रस्त्याच्या कडेला उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी पाण्यातून बाहेर काढले. त्याचप्रमाणे टोयोटा इनोव्हा आणि मारुती स्विफ्ट हॅचबॅकलाही दुसऱ्या बाजूला ढकलण्यात आले. ही वाहने ओलांडल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनर रस्त्यावर येताना दिसते. मात्र, पाणी पाहून चालकाने थांबून दुसरा रस्ता धरला.

टोयोटा फॉर्च्युनर नंतर, महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही पाण्यात उतरली. महिंद्राच्या स्कॉर्पिओ-एन या नव्या गाडीचीही तीच परिस्थिती होते. एसयूव्हीचा मागील भाग पाण्यात तरंगू लागला. याचा अर्थ वाहनचालकाचे वाहनावर नियंत्रण राहिले नाही.

अखेर, सर्व गाड्यांवर मात करत महिंद्रा थार ४×४ सहज पाण्यातून गेली. अगदी क्षणभर न लागता थार तेवढ्या पाण्यातून बाहेर आली. महिंद्रा थारची वॉटर वेडिंग क्षमता ६५० मिमी आहे. चालकाला त्याच्या क्षमतेची कल्पना होती. फॉर्च्युनर, ज्याला ओलांडण्याचा प्रयत्न देखील केला गेला नाही, त्याची वॉटर वेडिंग क्षमता ७०० मिमी आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एनची पाणी शोषण्याची क्षमता फक्त ५०० मिमी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Toyota fortuner mahindra scorpio n and the mahindra thar performed on a waterlogged road viral video pdb

First published on: 14-07-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×