टोयोटा किर्लोस्कर मोटरने इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही ही कार २८ डिसेंबर,२०२२ रोजी लाँच केली आहे. या कारबाबत गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, कारची किंमत किती असणार आहे हे जाणून घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते अखेर या कारच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. इनोव्हा हायक्रॉस एमपीव्हीची किंमत १८.३० लाख ते २८.९७ लाख यादरम्यान असणार आहे. ही एक्स शो रूम किंमत आहे. पुढच्या महिन्यापासून हे मॉडेल डिलर्सकडे उपलब्ध असेल.

या गाडीच्या सेल्फ चार्जिंग हायब्रीड आवृत्तीची किंमत २४.०१ लाख ते २८.९७ लाख रुपये असेल. तर पेट्रोल व्हेरियंटची किंमत १८.३० ते १९.२० लाख रुपये यादरम्यान असेल. २५ नोव्हेंबरपासून या कारचे बुकिंग सुरू करण्यात आले होते. या कारचे फीचर्स काय आहेत जाणून घ्या.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

कारचे आकर्षक फिचर्स:

हायब्रीड म्हणजेच पेट्रोल आणि वीजेवर चालणारे इंजिन हे या मॉडेलचे खास वैशिष्ट्य आहे. प्रति लिटर २१.१ मायलेजचा दावा कंपनीने केला आहे. हायक्रॉसची लांबी ४,७५५ मिमी. असून रुंदी १,८५० मिमी. आहे. इनोव्हा क्रिस्टापेक्षा लांबी- रुंदी अधिक आहे. व्हीलबेसही १०० मीमीने अधिक आहे. या कारचे इंटिरिअर क्रिस्टापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. ४.२ इंचांचा एमआयडी डिस्प्ले आणि १०.१ इंचांचा फ्लोटिंग टच स्क्रीन हेही या गाडीचे वैशिष्ट्य असून गाडीतील पुढच्या व मागच्या एसीमधील तापमान स्वतंत्रपणे सेट करण्याची सोय देण्यात आली आहे. हायक्रॉसला मोठे पॅनारोमिक सनरूफही देण्यात आले आहे. आतमध्ये जेबीएलचे नऊ स्पिकर्स असलेली साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे.

टोयोटाने या निमित्ताने प्रथमच भारतात एडीएएस ही सुरक्षा प्रणाली हायक्रॉसमध्ये वापरली आहे. या मध्ये लेन कीप असिस्ट, रेअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, प्री- कोलिजन सिस्टिम आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांचा समावेश करण्यात आला आहे.  इंधन पूर्ण भरलेले असेल तर २१.१ किलोमीटर्स प्रतिलीटर या क्षमतेने ही कार एक हजार ९७ किलोमीटर्सचा प्रवास करू शकते, असा कंपनीचा दावा आहे.