Toyota Car Booking Open: टोयोटा कंपनीचा भारतीय वाहन बाजारात चांगलाच जम बसला आहे. या कंपनीच्या वाहनांना बाजारात तगडी मागणी आहे. त्यामुळेच ही कंपनी भारतात मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रानंतर पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक कार विकणारी कंपनी ठरली आहे. फुल साईज एसयूव्हींच्या बाजारात टोयोटाच्या फॉर्च्यूनरचा दबदबा आहे. त्याचबरोबर टोयोटाची एक एमपीव्ही कार आहे जी देशातली लोकप्रिय एमपीव्ही कार ठरली आहे, त्या कारची बाजारपेठेत धडाक्यात विक्री होत आहे. या कारच्या तगड्या मागणीमुळेच कंपनीने काही दिवसापूर्वी या कारचे बुकींग बंद केले होते. आता पुन्हा एकदा कंपनीने या कारची बुकींग सुरु केली आहे. टोयोटाने त्यांच्या लोकप्रिय MPV इनोव्हा हायक्रॉससाठी बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. या कारला सातत्याने बुकिंग मिळत होते, मात्र जास्त मागणीमुळे कंपनीने या कारचे बुकिंग बंद केले होते. टोयोटाने टॉप-स्पेक इनोव्हा हाय क्रॉस व्हेरियंटसाठी बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. तुम्ही ऑगस्टमध्ये इनोव्हा हायक्रॉस बुक केल्यास तुम्हाला डिलिव्हरीसाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल ते जाणून घ्या. (हे ही वाचा :Honda Activa 110 चा खेळ संपणार? बाजारपेठेत उडाली खळबळ; TVS Jupiter नव्या अवतारात देशात होतेय दाखल, किंमत…) रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही आज टोयोटा इनोव्हा हायक्रॉस बुक केले तर तुम्हाला या कारच्या डिलिव्हरीसाठी सहा महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागेल. परंतु हे हायब्रिड प्रकारांना लागू होईल. सध्या त्याच्या ZX आणि ZX (O) प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. तर त्याच्या पेट्रोल प्रकारासाठी प्रतीक्षा कालावधी किमान २६ आठवडे आहे. ही सात सीटर एमपीव्ही आहे जी तिच्या आरामदायी राइडसाठी ओळखली जाते. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला देशभरातील कारप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जबरदस्त फिचर्ससोबत येते आणि बऱ्याच सेगमेंटमध्ये चांगली आहे. ही MPV हायब्रिड आणि पेट्रोल इंजिन अशा दोन्ही पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. ही एक लक्झरी कार आहे जी अनेक चांगल्या आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह येते. त्याच्या सर्व सीट आरामदायी आहेत. Toyota Innova Hycross ची एक्स-शोरूम किंमत ३०.९८ लाख रुपयांपासून सुरू होते. हे GX, GX (O), VX, VX(O), ZX आणि ZX(O) प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये १९८७ cc चे इंजिन आहे, जे १८३.७२bhp पॉवर आणि १८८ Nm टॉर्क देते. कंपनीचा दावा आहे की ते एका लिटरमध्ये २३.२४ किलोमीटरचे मायलेज देते. इनोव्हा हायक्रॉसमध्ये जागेची कमतरता नाही, सात ते आठ लोकांसाठी बसण्याची जागा आहे. सुरक्षेसाठी, एअरबॅग्स व्यतिरिक्त, यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील आणि पॉवर विंडो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याचे ग्राउंड क्लीयरन्स १८५ मिमी आहे.