काही दिवसांपासून इनोव्हाबाबत इंटरनेटवर भरपूर चर्चा होत आहे. नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये अनेक बदल आणि नवीन फीचर दिसणार असल्याचे सांगितले जात होते. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या वाहनाला सनरूफ मिळणार असल्याचे काही अहवालांतून समोर आल्याने या वाहनाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इनोव्हा हायक्रॉस भारतात २५ नोव्हेंबर रोजी सादर होणार आहे. मात्र, चाहते तिला आधीच पाहू शकतात. कारण इंडोनेशियामध्ये इनोव्हा हायक्रॉस ही इनोव्हा झेनिक्स म्हणून सादर झालेली आहे. या वाहनामध्ये काय फीचर्स आणि कोणते बदल घडवले गेले आहेत, याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहनाचा आकार

इंडोनेशियामध्ये सादर केलेल्या इनोव्हा झेनिक्सची लांबी ४७५५ मिमी, रुंदी १८५० आणि उंची १७९५ इतकी आहे. वाहनाचे व्हिलबेस २८५० एमएम आहे. इनोव्हा हायक्रॉसमध्ये १८५ एमएमचा ग्राउंड क्लियरंस मिळेल. आगामी इनोव्हा हायक्रॉस टोयोटाच्या नव्या मोनोकॉक चॅसीवर आधारीत असेल. या चॅसीमुळे राइडची गुणवता सुधारण्याची शक्यता आहे.

(QJ MOTORS ने सादर केल्या ४ दमदार बाईक्स; रॉयल इन्फिल्ड, होंडाला ठरू शकतात उत्तम पर्याय, पाहा फोटो)

इंजिन

इनोव्हा झेनिक्समध्ये हायब्रिड टेक्नॉलाजीचा वापर करण्यात आला आहे. इनोव्हा झेनिक्स हायब्रिड ईव्ही १५२ पीएसची शक्ती आणि १८८ एनएमचा टॉर्क निर्माण करते. इलेक्ट्रिक मोटरने 4 सिलेंडर ड्युअल व्हीव्हीटी आय इंजिन अधिक शक्तिमान होऊन ११३ पीएसची शक्ती आणि २०६ एनएमचा टॉर्क निर्माण करेल, याने वाहनाची शक्ती १८६ पीएस इतकी होईल.

दोन्ही पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनमध्ये सीव्हीटी ट्रान्समिशन युनिट मिळते. हायब्रिड मॉडेलमध्ये ईको, नॉर्मल, पावर आणि ईव्ही असे ४ ड्राइव्ह मोड्स मिळतात.

(क्रुझर सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढली; होंडाने सादर केली 2023 Rebel 500, ‘या’ बाईकला देणार टक्कर, जाणून घ्या किंमत)

एसयूव्ही सारखी दिसते

नवीन इनोव्हा एमपीव्ही एसयूव्ही सारखी दिसते. वाहनाला मोठे आणि ठसठशीत असे ग्रील असून त्यात क्रोमचा कमी वापर दिसून येतो. ग्रीलच्या दुतर्फा स्लिक एलईडी लाईन आणि एलईडी डिआरएल बार्स देण्यात आले आहेत. वाहनाचे बंपर दणकट असून त्याच्या दोन्ही बाजूला मोठे एअर व्हेंट्स देण्यात आले आहेत.

मोठ्या व्हील आर्क्स आणि उतरत्या रूफ लाईनमुळे हे वाहन एसयूव्ही सारखे वाटते. वाहनाच्या केबिनमध्ये मोठी फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट प्रणाली मिळेल. मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी देखील डिजिटल स्क्रिन्स देण्यात आले आहेत. वाहनामध्ये पहिल्यांदाच पॅनोरोमिक सनरूफ मिळत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota innova hycross unveiled as innova zenix in indonesia will launch in india on 25 november ssb
First published on: 22-11-2022 at 11:07 IST