Toyota Kirloskar Motor (TKM) हे एक वाहन उत्पादक कंपनी आहे. देशातील कंपन्यांपैकी ही एक लोकप्रिय कंपनी आहे. आज कंपनीने आपल्या नवीन इनोव्हा क्रिस्टा साठी बुकिंग सुरु केले आहे. ५०,००० रुपयांमध्ये कंपनीने या गाडीचे बुकिंग सुरु केले आहे. इच्छुक खरेदीदार टोयोटोच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अधिकृत डिलरशिप असलेल्या ठिकाणी बुकिंग करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच लाँच झालेले इनोव्हा हायक्रॉसच्या अनुषंगानेच नवीन इनोव्हा क्रिस्टाचे बुकिंग सुरु झाले आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टल चार ग्रेड G, GX, VX आणि ZX तसेच व्हाइट पर्ल क्रिस्टल शाइन, सुपरव्हाइट, सिल्व्हर, अॅटिट्यूड ब्लॅक आणि ब्रॉन्झ या पाच रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा : फक्त १२ हजारांमध्ये घरी घेऊन या Suzuki ची ‘ही’ जबरदस्त स्कुटर; एका लिटरमध्ये धावणार…

टोयोटो किर्लोस्कर मोटरचे व्हाईस प्रेसिडेंट, सेल्स एंड स्ट्रेटेजिक मार्केटिंगचे उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले की, २००५ मध्ये इनोव्हा लाँच झाल्यानंतर या मॉडेलने ग्राहकांची मने जिंकली आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना कळवू इच्छितो की त्यांची आवडती MPV आता चार श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. आरामदायी आणि सुरक्षित व व्यावहारिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे मॉडेल एक आदर्श पर्याय आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉस या दोन्ही गाड्यांचे बुकिंग उपलब्ध असल्याने आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की, आमच्या ग्राहकांना त्यांच्या आवडीची इनोव्हा खरेदी करण्याची इच्छा बाळगतात , असे ग्राहक आता ड्राईव्हचा आनंद घेऊ शकतात असे अतुल सूद म्हणाले.

काय आहेत फीचर्स ?

नवीन इनोव्हा क्रिस्टा चार ग्रेड G, GX, VX आणि ZX तसेच व्हाइट पर्ल क्रिस्टल शाइन, सुपरव्हाइट, सिल्व्हर, अॅटिट्यूड ब्लॅक आणि ब्रॉन्झ या पाच रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. हे मॉडेल तयार करताना डिझाईनचा खूप विचार करण्यात आला आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टा हे मॉडेल फक्त दंडिझेल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये २.४ लिटर डिझेल इंजिन आहे. जे १४८ बीएचपी आणि ३४३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी कनेक्ट होते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota kirloskar motor started bookings for the diesel model of the new crysta at fifty thousand tmb 01
First published on: 27-01-2023 at 18:55 IST