Data Leak: गेल्या काही वर्षापासून वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणात डेटा लिक होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. आता हॅकर्सच्या निशाण्यावर ऑटोमोटीव्ह कंपन्या आल्या आहेत. नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली असून मात्र, या कार कंपनीच्या ग्राहकांचा इंटरनेटवर वैयक्तिक डेटा लीक झाल्याच्या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. या कंपनीने अधिकृत पत्रक काढत याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

‘या’ कार कंपनीच्या ग्राहकांचा वैयक्तिक डेटा लीक

नुकतेच काही दिवसापूर्वी Kia India चे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली होती. आता टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या (TKM) ग्राहकाची खाजगी माहिती इंटरनेटवर लीक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. टोयोटा कारच्या किती ग्राहकांचा डेटा इंटरनेटवर लीक झाला आहे, तसेच यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांनी अधिकृत पत्रक काढत याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”

(हे ही वाचा : भन्नाट ऑफर! फक्त १ लाख डाऊन पेमेंटवर घरी आणा देशातली बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट SUV; समजून घ्या संपूर्ण गणित)

CERT-In करणार सखोल चौकशी

टोयोटाने सांगितले की, या घटनेची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ला देण्यात आली आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, इंडियन कम्प्युटर्स रिस्पॉन्स टीम या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कंपनीच्या ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, टोयोटा मोटरच्या  T-Connect सेवा वापरणाऱ्या सुमारे २९६,000 ग्राहकांची माहिती लीक झाली होती.