scorecardresearch

Toyota Lunar Cruiser उतरणार चंद्र आणि मंगळ ग्रहावर!; गाडीची डिझाईन पाहून तुम्हीही व्हाल आवाक

टोयोटा गेल्या काही दिवसांपासून जापान एअरोस्पेश एक्सप्लोरेशन एजन्सीसोबत चंद्रावर धावणाऱ्या वाहनाची निर्मिती करत आहे.

Toyota_Lunar_Cruiser
Toyota Lunar Cruiser उतरणार चंद्र आणि मंगळ ग्रहावर!; गाडीची डिझाईन पाहून तुम्हीही व्हाल आवाक (Photo- AP)

टोयोटा गेल्या काही दिवसांपासून जापान एअरोस्पेश एक्सप्लोरेशन एजन्सीसोबत चंद्रावर धावणाऱ्या वाहनाची निर्मिती करत आहे. या दशकाच्या अखेरीस अंतराळवीरांना चंद्रावर या वाहनाचा वापर करता येईल, असा दावा करण्यात येत आहे. यात यश मिळाल्यानंतर २०४० पर्यंत मंगळावर वाहन उतरवण्याची मोहीम हाती घेतली जाईल. वाहन लुनार क्रुझर या नावाने ओळखले जात आहे. हे नाव प्रतिष्ठित टोयोटा लँड क्रुझर एसयूव्हीवरून घेण्यात आले आहे. चंद्र आणि मंगळावर लोकांना घेऊन जाण्यासाठीच नव्हे तर पूर्ण सुसज्ज निवाराही उपलब्ध व्हावा यासाठी लुनर क्रूझरची रचना करण्यात आली आहे. असोसिएटेड प्रेसने टोयोटा मोटर कॉर्पोरेशनमधील लुनार क्रूझर प्रकल्पाचे प्रमुख ताकाओ सातो सांगितले की, “हे वाहन खरोखरच अंतराळात राहण्यायोग्य वातावरण प्रदान करू शकते. आम्ही अवकाशातील एका बदलाकडे एक पाऊल म्हणून पाहतो. अंतराळात जाऊन, आम्ही दूरसंचार आणि इतर तंत्रज्ञान विकसित करू शकतो जे मानवी जीवनासाठी मौल्यवान ठरेल.”

चंद्रावरील वाहन तयार करणं वाटतं तितकं सोपं नाही. डोंगराळ भागात नेविगेट करण्यास सक्षम असणं गरजेचं आहे. आरामदायी आणि घरासारखं असलं पाहीजे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याची बांधणी महत्त्वाची आहे. लुनार क्रुझरमध्ये Gitai Japan Inc ने खास डिझाइन केलेले आणि विकसित केलेले विशेष रोबोटिक शस्त्रे असतील. रोबोटिक हँड ग्रॅपल फंक्शनने सुसज्ज असेल आणि विविध यांत्रिक कार्यांसाठी त्याचा वापर होईल.

सध्या, पॉवरट्रेन, तिचे केबिन आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल तपशील समोर आलेले नाहीत. पण टोयोटाच्या वाहने पृथ्वीवरील बहुतेक भाग आणि भूप्रदेशांवर फिरू शकतात. दुसरीकडे, अंतराळात वाहतुकीसाठी वाहन विकसित करण्याची वेळ आली आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Toyota lunar cruiser made for moon and mars rmt