Toyota Sells 12,835 Units In January 2023: टोयोटा किर्लोस्कर मोटरने जानेवारी २०२३ मधील त्यांच्या विक्रीचे आकडे उघड केले आहेत. या जपानी कार निर्मात्याच्या भारतीय उपकंपनीने गेल्या महिन्यात १२,८३५ युनिट्सची विक्री केली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत १७५ टक्के वाढ नोंदवली आहे. टोयोटाने जानेवारी २०२२ मध्ये ७,३२८ मोटारींची विक्री केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाय, डिसेंबर २०२२ च्या तुलनेत कंपनीने १०,४२१ युनिट्सची विक्री करताना 23 टक्के वाढही नोंदवली आहे. टोयोटाच्या विक्रीतील वाढीचे श्रेय नव्याने लाँच झालेल्या अर्बन क्रूझर Hyryder SUV ला दिले जाऊ शकते. शिवाय, टोयोटा फॉर्च्युनर आणि ग्लान्झा यांचाही कार निर्मात्याच्या एकूण विक्रीत मोठा वाटा आहे.

(हे ही वाचा : बसपासून ते कारपर्यंत! १ एप्रिलपासून ९ लाख सरकारी वाहने भंगारात, नितीन गडकरींची घोषणा )

कामगिरीबद्दल भाष्य करताना, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष, अतुल सूद म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरसाठी २०२२ हे वर्ष सकारात्मकतेने संपले. कंपनीने गेल्या दशकात सर्वाधिक घाऊक विक्री केल्यामुळे, नवीन वर्षात मोठ्या उत्साहाने आणि आशावादाने पाऊल ठेवले आहे. महिना-दर-महिना १७५ टक्क्यांच्या मजबूत वाढीसह, आम्ही या वर्षी ग्राहकांच्या मागणीला आणखी गती देऊ, असे ते म्हणाले.

गेल्या महिन्यात, टोयोटाने अद्ययावत इनोव्हा क्रिस्टलच्या डिझेल प्रकारांसाठी अधिकृतपणे ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्याच्या किमती जाहीर केल्या जातील. कंपनीने नवीन अर्बन क्रूझर Hyryder CNG देखील लॉन्च केले आहे, ज्याची एक्स-शोरूम १३.२३ लाख रुपयांची प्रारंभिक किंमत आहे. टोयोटाने ऑटो एक्सपो 2023 मध्ये देखील भाग घेतला आणि अनेक मॉडेल्सचे प्रदर्शन केले.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota sales 2023 calendar year posting a 175 per cent growth over january 2022 the carmaker reported wholesales of 12 835 units in january 2023 pdb
First published on: 01-02-2023 at 13:25 IST