आजकाल आपल्या देशामध्ये वाहनांच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक स्थिती आणि राहणीमान सुधारल्याने बहुतांश लोक खासगी वाहन वापरत आहेत. पण यामुळे ट्रॅफिक जामचा गंभीर प्रश्न आणखी मोठा होत चालला आहे. रस्त्यावर दुतर्फा गाड्याच गाड्या पाहायला मिळतात. एखाद्या महत्त्वपूर्ण कामासाठी ठराविक जागी वेळेत पोहोचायचे असताना ट्रॅफिक लागल्याने उशीर होऊ शकतो. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने वेळ आणि इंधन दोन्ही खर्च होत असते. तसं पाहायला गेलं तर ट्रॅफिक होणं आपण रोखू शकत नाही, पण ते टाळण्यासाठी नक्कीच काहीतरी करु शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तवाहिन्यांद्वारे ट्रॅफिक रिपोर्ट्सची माहिती मिळवा.

कोणत्या रस्त्यावर गर्दी आहे; कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते किंवा गर्दी टाळण्यासाठी कोणत्या मार्गावरुन जाणए टाळावे अशा गोष्टींची माहिती अनेक स्थानिक वृत्तवाहिन्या देत असतात. रेडिओ चॅलन देखील ही माहिती देत असतात. ट्रॅफिक पोलिस आणि स्थानिक चॅनलचे सोशल मीडिया हॅंडल्स फॉलो करुन ट्रॅफिक रिपोर्ट्सची माहिती मिळवता येते. यावरुन कोणत्या रस्त्यावरुन जायचे आहे हे ठरवू शकता.

पर्यायी मार्ग जाणून घ्या.

गंतव्यस्थानी पोहचण्यासाठीच्या विविध मार्गांबद्दल जाणून घेतल्याने तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणे टाळू शकता. जर एखाद्या रस्त्यावर वाहनांची गर्दी असेल, तर तुम्ही दुसऱ्या रस्त्यावरुन पुढे जाऊ शकता. पर्यायी मार्ग जाणून घेतल्याने तुम्ही गंतव्यस्थानापर्यंत लवकरात लवकर पोहचू शकाल.

Peak Hours मध्ये घराबाहेर जाणे टाळा.

सकाळी असंख्य लोक ऑफिसला जात असतात. हे लोक संध्याकाळी ऑफिसवरुन घरी येत असतात. त्याचप्रमाणे सकाळी मुलं शाळा, कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडत असतात. तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी काही ठराविक तासांमध्ये रस्त्यावर भरपूर गर्दी असते. Peak Hours ला होणारा ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी घरातून किंवा ऑफिसमधून थोड लवकर निघावे. तुम्ही प्रवासाचे योग्य नियोजन देखील करु शकता.

आणखी वाचा – जपानला मागे टाकत भारत बनला Automobile क्षेत्रातला तिसऱ्या क्रमांकाचा देश; नितीन गडकरी म्हणाले, “२०२८ पर्यंत आपण..”

Traffic apps ची मदत घ्या.

सध्या गुगल प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांच्यामार्फत ट्रॅफिकचे रिअल टाइम अपडेट्स मिळवता येतात. या अ‍ॅप्सचा मदतीने तुम्ही गर्दी असलेल्या जागी जाणे टाळू शकता.

आणखी वाचा – Hero HF Deluxe चे Canvas Black Edition झाले लॉन्च; ४ नव्या कलर व्हेरिएंट्ससह मिळणार अत्याधुनिक फिचर्स, किंमत आहे फक्त..

गरज नसल्यास वाहनाचा वापर कमी करा.

गाडी घेतल्यानंतर अनेकांना चालायला कंटाळा येतो. काही वेळेस वाहनाची इतकी सवय लागते, की लोक ५ मिनिटावर जाण्यासाठीही गाडी वापरतात. यामुळे ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता वाढते. कधीकधी गाडी पार्क करताना इतरांना त्रास होतो. त्यामुळे गरज नसल्यास गाडीऐवजी पायी चालत गंतव्यस्थानी जा. शक्य असल्यास सायकलचा वापर करा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam issue in mega cities like mumbai delhi bangalore follow these 5 simple key tips to avoid getting stuck in traffic jams yps
First published on: 05-06-2023 at 15:41 IST